आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात करा \'ही\' कामे, पुढील 3 महिन्यांमध्ये होऊ शकते 3 लाख रुपयांपर्यंत कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही चांगली कमाई करण्याचे पर्याय शोधत असाल तर बटण मशरुमची शेती करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.  हा मशरुमचा एक प्रकार असून, यामध्ये मिनरल्स आणि विटामिनचे प्रमाण जास्त असतात. कमीत कमी जागेत याची उत्तमप्रकारे शेती केली जाऊ शकते. मशरुम आरोग्यासाठी उपयुक्त असल्या कारणाने याची मागणी जास्त आहे. बाजारात याचा सध्याचा भाव प्रति किलो दराने 300 ते 350 रुपये आहे.
 मोठ्या शहरामध्ये या मशरुमचा भाव जास्त असल्यामुळे बरेच लोक आपली पारंपारीक शेती सोडून मशरुमची शेती करुत चांगली कमाई करत आहे. उदाहरणार्थ, गोरखपूरमधील शेतकरी राहूल सिंह. पुढे वाचा किती आहे कमाई

 

लागन खर्च आणि होणारी कमाई

राहूल दरवर्षी 4 ते 5 क्विंटल कंपोस्‍ट बनवून त्यावर बटण मशरुमची शेती करतात. एवढ्या कंपोस्टवर साधारण 2000 किलो मशरुम तयार होते. एक क्विंटल कंपोस्टसाठी दीड किलो बियाने लागते. बाजारात याची किंमत प्रतिकिलो दराने 200 ते 250 रुपये आहे. बाजारात मशरुमची किंमत 150 ते 200 रुपये असल्यास 2000 किलो मशरुम 150 रुपये किलो दराने विकले तर साधारण 3 लाख रुपयांपर्यंत कमाई होते. 50 हजार रुपये लागन खर्च वगळता अडीच लाख रुपये कमाई होते.

 

अशा प्रकारे केली जाते मशरुमची शेती 

> मशरुम ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान लावल्यानंतर पुर्ण हिवाळ्यात याचे उत्पादन निघते.
> राहूल जवळपास 40 बाय 30 फुटांच्या झोपडीमध्ये याची शेती करतात. त्यामध्ये ते 3-3 फुटांवर मोठी रॅक बनवून त्यावर मशरुम उगवतात.

तुम्हालाही मशरुमची शेती करायची आहे 

> यासाठी तुम्हाला कंपोस्ट खत तयार करावे लागते. तुम्ही भाताच्या शेतीतल्या काड्यांचा उपयोग करु शकता. यासाठी या काड्यांना पाण्यात एक रात्र भिजवून त्यावर डीएपी, युरीया, पोटॅश, जिप्सम, कॅल्शिअम आणि कार्बो फ्युराडन टाकून त्याला सडण्यासाठी ठेवा. 
> 30 दिवसांमध्ये दर चार दिवसांनी त्याला उलथवत रहायचे. 15 दिवस झाल्यानंतर त्यामध्ये निंबाची खळ, गुळाचा पाक आणि शीरा मिसळवा.
> एक महिन्यानंतर त्या खतावर बाविस्टीण आणि फार्मोलीण शिंपडावे त्यानंतर सहा तासांसाठी त्याला झाकून ठेवावे. अशा प्रकारे तुम्ही कंपोस्ट खत तयार करु शकतात.

 

पुढे वाचा-  कसे पसरवाल कंपोस्ट खत

 

बातम्या आणखी आहेत...