आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Start Of Bald At The Age 25, A Business Of Rs 22 Thousand Crore Of Hair Transplant

पंचविशीतच टकलास सुरुवात, २२ हजार कोटी रु.चा व्यवसाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मेंद्रसिंह भदोरिया

नवी दिल्ली - बॉलीवूड चित्रपटांमुळे टक्कल पडणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आनुवंशिकता, कोंडा, क्षारयुक्त पाणी आणि वेगाने बदलत चाललेल्या दिनचर्येमुळे केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, देशात जवळपास प्रत्येक व्यक्तीला केसांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यातील जास्त लोक या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. केस प्रत्यारोपण करणाऱ्यांच्या संख्येमध्ये गेल्या पाच वर्षांत १० पटीने वाढ झाली आहे. तर सद्य:स्थितीत यामध्ये २० पटीने वाढ होत आहे. भारतात केस प्रत्यारोपण करण्यासाठी फोलिकल युनिट एक्स्ट्रॅक्शन (एपयूई) किंवा स्ट्रीप प्रक्रिया सर्वाधिक लोकप्रिय आहे. 

व्हीएलसीसीचे संचालक संदीप आहुजा यांनी देशात सद्य:स्थितीत हेअरकेअरची बाजारपेठेत सुमारे २२ हजार कोटींची उलाढाल होत असल्याचे सांगितले. यामध्ये दरवर्षी आठ ते दहा टक्क्यांनी वाढ होत आहे. या बाजारपेठेत ४० ते ५० टक्के भाग तेलाने व्यापलेला आहे. यात शॅम्पू आणि हेअर विगचाही समावेश आहे. तर केस प्रत्यारोपण करण्यामध्येही वर्षभरात २० टक्के वाढ झाली आहे. केस प्रत्यारोपण करण्यासाठी ४० हजार ते ३.५० लाख एवढा खर्च येतो. आमच्याकडे उपचार करण्यासाठी मध्यपूर्व, दक्षिणपूर्व आशियातून लोक येतात असे आहुजा यांनी सांगितले. केस गळण्याचे मुख्य कारण अानुवंशिकता आहे. आई-वडिलांना केसगळतीची समस्या असल्यास पुढच्या पिढीतही ही समस्या उद्भवते. क्षारयुक्त पाणी असलेल्या ठिकाणी केसगळतीची समस्या आढळते. 
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. कुलदीप सिंह यांनी सांगितले की, इतर कारणांशिवाय तणाव, शारीरिक व्यायाम आणि पौष्टिक अन्नाच्या कमतरतेमुळे देखील केसगळतीच्या समस्येमध्ये वाढ झालेली आहे. २५ वर्षांपूर्वी ४० वयानंतर डोक्यावरची केसगळती सुरू व्हायची, मात्र आता २५ वय असलेल्यांनाही ही समस्या उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. जोखीम नसल्याने व स्वस्त उपचार मिळत असल्याने लोक केसांचे प्रत्यारोपण करत आहे. शस्त्रक्रियेसाठी ज्या लोकांना डोनर हेअर (कानाच्या मागील डोक्याचे केस) कमी असतात, त्यांना विंग वापरावे लागते. आमच्याकडे उपचार घेण्यासाठी आशियाई देशांशिवाय आफ्रिकेतूनही लोक येतात, असे सिंह यांनी सांगितले.

निल्सन या सर्वेक्षण संस्थेच्या द ब्यूटी मार्केट इज लेटिंग इंट्स हेअर डाउन या अहवालानुसार पुरुषांसाठी केस सुंदर असणे महत्त्वाचे झाले आहे. १३ टक्के लोकांनी सुंदर दिसण्यासाठी शरीरयष्टीला महत्त्व दिले आहे तर ३० टक्के पुरुषांनी केसांना महत्त्व दिले आहे. सुंदर दिसण्यासाठी २२ टक्के महिलांनी केसांना महत्त्व दिले आहे. ग्रामीण क्षेत्राच्या तुलनेत शहरी भागातील लोक केसांच्या देखभालीवर तीनपटीने जास्त खर्च करतात. 
 

देशात केस प्रत्यारोपणासाठी एफयूई लोकप्रिय
प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि केस प्रत्यारोपण सर्जन आणि तज्ञ डॉ. डीजेएस तुल्ला यांच्या माहितीनुसार दोन प्रकारचे केस प्रत्यारोपण प्रसिद्ध आहे. पहिली, फोलिकल युनिट ट्रान्सप्लांट (एफयूटी) पद्धत आहे, यामध्ये शस्त्रक्रिया केली जाते. मायक्रोस्कोपद्वारे एक-एक केसाला वेगळे करून लावले जाते. तर दुसरी प्रक्रिया फोलिकल युनिट एक्स्ट्रॅक्शन (एफयूई) मध्ये टाके न देता व चीर न पाडता केसांना डोक्यात लावले जाते. आता ट्रान्सप्लांट मॅन्युअलसह रोबोटिकही सुरू झाले आहे. रोबोटिक सर्जरी थोडी महाग असते. ट्रान्सप्लांटशिवाय अतिरिक्त विग, पॅच आणि हेअर वीव्हिंगचा वापर केला जातो. 
 

सौंदर्याच्या या पाच प्रकारांना महिला व पुरुष असे देतात प्राधान्य
    पुरुष     महिला 
केस    30%    22%
शरीर    13%    21%
चेहरा     10%    14%
त्वचा    08%    09%
हावभाव    07%    08%

स्रोत: निल्सन स्टडी (एच 2 2017)
 

बातम्या आणखी आहेत...