आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 लाख रुपयांत सुरु करा आपला व्यवसाय, नोकरीपेक्षा जास्त कमाई करु शकाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आजच्या तरुणांना इतरांकडे काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे आवडते. योग्य व्यवस्थापन आणि अभ्यासाने व्यवसाय केला तर नोकरीपेक्षा जास्त कमाई केली जाऊ शकते. यामुळे तरुण सुरुवातीला नोकरी करतात. फंड जमा झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु करतात. 

 

> जितकी जास्त गुंतवणूनक तितकी जास्त कमाई
तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितका मोठा व्यवसाय सुरु करू शकता. पण मनी भास्कर फक्त 5 लाख रुपयांत आपला यशस्वी व्यवसाय सुरु करण्याबाबत माहिती देत आहे. यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रायलाचे निवृत्त सल्लागार देबाशीष बंदोपाध्याय यांनी 5 लाख रुपयांत कसा आणि कोणता व्यवसाय सुरु करता येतो याबाबत सांगितले आहे. 


> फंड कसा गोळा करायचा
स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्या पगारानुसार एक निर्धारित वेळेसाठी एक निर्धारित फंड गोळा करा. कारण ज्या हिशोबाने फंड खर्च करताल त्यानुसार मोठ्या व्यवसायाची सुरुवात करता येईल आणि त्याआधारे कमाई करू शकाल. तुमचा वार्षिक पगार 5 लाख रुपये असेल आणि तुम्ही पाच वर्षांत पाच लाख रुपये फंड उभारला तर या रकमेतून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करून 50 हजार रुपये प्रती महिना कमाई करू शकता. 

 

> आपल्या ज्ञानानुसार व्यवसायाची निवड करा
व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमची पार्श्वभूमी महत्वाची भूमिका पार पाडते. तुम्ही जर इंजिनिअरिंग क्षेत्रातील असाल तर वेबसाइट किंवा कॉम्प्युटर क्षेत्रातील व्यवसाय सुरु करु शकतात. पण इंजिनिअरिंग क्षेत्रात असल्यामुळे तुम्ही इतर व्यवसाय करु शकणार नाहीत असे नाही. कारण व्यवसाय मूलभूत माहिती आणि व्यवस्थापनाने करावा लागतो. अशात तुम्हाला संबंधित क्षेत्रातील माहिती नसताना तुम्ही त्या क्षेत्रातील मूलभूत माहिती प्राप्त करून व्यवसाय सुरु करु शकता. 

 

> मार्केटचा रिसर्च करा
व्यवसाय सुरु करण्यापूर्वी मार्केटचा योग्यरित्या अभ्यास करा. या तंत्रज्ञानाच्या युगात कोठुनही व्यवसाय सुरु करु शकतात. मार्केटमध्ये सुरुवातीपासून बरेच प्रतीस्पर्धी आहेत. अशात तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळी सर्व्हिस कशी देऊ शकाल हे महत्वाचे ठरते. यामध्ये ग्राहकांचे अभिप्राय घेणे देखील समाविष्ट आहे. 


> सेवा क्षेत्रातील संधी 
देवाशीष यांनी सांगितले की, 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत उत्पादन व्यवसाय करणे कठीण काम आहे कारण ते खूप नियामक आहे. सोबतच स्वतःची जागा किंवा फॅक्ट्रीसाठी किराणाने जमीन विकत घ्यावी लागते. सध्याच्या काळात या जमिनीचे दर आकाशाला भिडलेले असतात. अशात सेवा क्षेत्रात व्यवसाय करणे सोयीस्कर ठरू शकते. 


> आपल्या ज्ञानानुसार व्यवसायाची निवड करा 
देवाशीषच्या मते, कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही कामासाठी कामगार जरी ठेवले तरी तुम्हाला कामाची माहिती नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून चांगले काम करवून घेऊ शकणार नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातून 6 महिन्यांचा अनुभव घ्यावा. मग तिथे विनापगारी काम करावे लागले तरीही ते करावे.

 

या क्षेत्रांत सुरु करू शकता व्यवसाय

रेस्त्रा
ब्यूटी पार्लर
ड्राय क्लीनिंग
ऑनलाइन मेडिसिनचा व्यवसाय
वेबसाइट मेकिंग अॅण्ड डिझाइनिंग

बातम्या आणखी आहेत...