आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Startup For IIT Students At Empower 2019: 20% Power Loss Through Hunger Treatment, Hunger Treatment

एम्पॉवर २०१९ मध्ये आयआयटी विद्यार्थ्यांचे स्टार्टअप : अॅपद्वारे तोतरेपणावर उपचार, कुबड्यांमुळे शरीरातील २०% ऊर्जेची बचत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात दिव्यांगांचे प्रमाण जास्त आहे. बहिरे, दृष्टिहीन, अपंग व तोतरे असे अनेक व्यंग असलेल्या लोकांसाठी आयआयटीच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी स्टार्टअप सुरू केले आहेत. त्यांनी एक ते दीड वर्षात दिव्यांगांसाठी खास २० हून अधिक उत्पादने तयार केली आहेत. याचे प्रदर्शन एम्पॉवर-२०१९ मध्ये करण्यात येत आहे. आयआयटी दिल्ली व मायक्रोसॉफ्ट यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. 
 

1 स्टारमुई अॅप: भावनात्मक हानीचे विश्लेषण करतो
मीत सिंघल तोतरे बोलत असत. आयआयटीत दाखल झाल्यानंतर त्यांनी यावर उपाय शोधला. अंशुल अग्रवाल या मित्राच्या मदतीने स्टामुराई नावाचे अॅप तयार केले. हे अॅप तोतरेपणामुळे भावनात्मक हानी कोणती व कशी होते, याचे विश्लेषण करणार आहे. यानंतर तोतरेपणावर मात करण्यासाठी अॅपची मदत होते. आतापर्यंत १२ हजार लोकांनी अॅप डाऊनलोड केले आहे. 
 

2 कुबड्या: डोंगर व वाळवंटी मार्गावर चालू शकतील
आयआयटीचा माजी विद्यार्थी श्रीनिवास याने कुबड्या तयार केेल्या आहेत. याचा कोठेही वापर करू शकता. आताच्या कुबड्यांच्या खालील भागात बदल करून नवी कुबडी तयार केली आहे. ती स्वत: उभी राहते. याचा वापर करणाऱ्याच्या शरीरातील २० टक्के ऊर्जा बचत होते. या कुबड्या डोंगराळ, वाळवंटी प्रदेश, कच्च्या-पक्क्या सडकांवर सहज वापरता येतात. दिल्ली एम्समध्ये याची चाचणी घेण्यात येत आहे. 
 

3 ब्रेल लॅपटॉप: दृष्टिहीनांना वाचता येईल
सुमन मुरली कृष्णन यांनी दृष्टिहीनांना हिंदी-इंग्रजी व तामिळ भाषेतील पुस्तके वाचता येतील, असे अॅप तयार केले आहे. याला ब्रेल लॅपटॉप अथवा डॉटबुक असेही म्हणतात. देशात अशा प्रकारचे पहिले तंत्रज्ञान विकसित झाले आहे. या भाषेतील पुस्तके अथवा सॉफ्ट कॉपी लॅपटॉपमध्ये सेव्ह करावी लागते. लॅपटॉपची प्रोग्रॅमिंग सॉफ्ट कॉपीला ब्रेललिपीत बदलून देते. लॅपटॉपचा डिस्प्ले ब्रेल लिपीच्या डॉटला उभार देतो.