आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आली होती कार, अचानक डिक्कीतून येऊ लागले विचित्र आवाज, मेकॅनिकने उघडून पाहताच जागेवरच थिजला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेर्रासन लेविलेडियू - फ्रान्समध्ये एक खूप विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपली प्रेग्नन्सी लपवण्यासाठी 2 वर्षांपर्यंत आपल्या मुलीला कारच्या डिक्कीत लपवून ठेवले. परंतु एकदा मेकॅनिकने मनाई करूनही दुरुस्तीसाठी आलेल्या महिलेच्या कारची डिक्की उघडली, तेव्हा ही घटना समोर आली. त्याला कारमधून विचित्र आवाज ऐकू येत होते. मेकॅनिकने आत पाहताच त्याला धक्काच बसला. डिक्कीत एका बॉक्समध्ये एक कुपोषित मुलगी झोपलेली होती, ती अगदी मृत्यूच्या दारात उभी होती. सोमवारी याप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली, ज्यात चकित करणारे खुलासे झाले आहेत. 

 

समोर आले 2 वर्षे जुने सत्य
- टेर्रासन लेविलेडियू येथील रहिवासी 50 वर्षीय रोझा मारिया डा क्रूझ आपल्या 3 मुलांसोबत राहत होती. तिला जेव्हा चौथ्या गर्भधारणेबाबत कळले तेव्हा ती घाबरली.
- रोझाला आपल्या चौथ्या गर्भधारणेविषयी मुले आणि पार्टनरला कळू द्यायचे नव्हते. तिने जगापासून लपून मुलीला जन्म दिला आणि तिला गॅरेजमध्ये आपल्या कारच्या डिक्कीत लपवून ठेवले. 
- एका दिवशी रोझा आपल्या कारच्या दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गेली. तिथे तिने मेकॅनिक्सना कडक शब्दांत सूचना दिली की, कारची डिक्की चुकूनही उघडू नका, कारण ती खूप जास्त भरलेली आहे.
- ती जाताच कारमधून विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. मेकॅनिक्सना वाटले की, आतमध्ये एखादे जनावर फसले असावे. यामुळे त्यांनी कार मालिकीणीच्या सूचनेनंतरही डिक्की उघडली. 
- मेकॅनिकने जेव्हा आतील दृश्य पाहिले तेव्हा त्याची बोबडीच वळली. डिक्कीत एका बॉक्समध्ये नग्नावस्थेत एक बालिका झोपलेली होती. ती खूप वाईट परिस्थितीत होती.
- मेकॅनिकने सांगितले की, आतून एवढी भयंकर दुर्गंधी येत होती की, तेथे उभे राहणेही कठीण झाले होते. 2 वर्षांची ही चिमुरडी कुपोषित होती आणि तिची नॉर्मल मुलांसारखी वाढही झालेली नव्हती.

 

अर्ध्या तासात गेला असता जीव
- मॅकेनिकने कार ओनरच्या आधी इमर्जन्सी नंबरवर फोन केला आणि घटनेची माहिती दिली. बालिकेला फर्स्टएड देण्यासाठी पोहोचलेल्या टीमने सांगितले की, जर डिक्की उघडली नसती, तर अर्ध्या तासाच्या आत मुलगी मृत्युमुखी पडली असती.
- यानंतर पोलिसांनी रोझा आणि तिचा हसबंड दोघांनाही याप्रकरणी अटक केली. त्यांच्यावर अल्पवयीनाचा छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला. दुसरीकडे, तिन्ही मुलांसहित या 2 वर्षीय बालिकेला फोस्टर केअरमध्ये ठेवण्यात आले.
- तथापि, नंतर रोझाच्या पार्टनरचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला की, त्याला याबाबत काहीही माहिती नव्हती. त्याला सोडून देण्यात आले आणि तिन्ही मुले आपल्या घरी परतली. तर पीडित बालिका अजूनही स्पेशलिस्टच्या केअरमध्ये आहे. रोझा जेलमध्ये आरोपांचा सामना करत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...    

 

बातम्या आणखी आहेत...