आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्र गोठल्याने अन्नासाठी रस्त्यावर भटकत आहेत हे सागरी जीव; लोकांनी सरकारकडे मागितली मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओटावा - कॅनडातील न्यूफाउंटलंडच्या एका परिसरात सागरी सील चक्क रस्त्यांवर भटकत आहेत. या सागरी जीवांमुळे नागरिकांनी दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले आहे. लोकांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते, समुद्रात उंच लाटा उठल्याने काही सील समुद्राबाहेर फेकल्या गेल्या. पुन्हा समुद्र गाठतील तोपर्यंत सागराचे बर्फ झाले. अशात अन्नासाठी हे सागरी जीव रस्त्यांवर भटकत आहेत. शहराच्या महापौर शीला फिट्सगेराल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोडिकटन शहराच्या रस्त्यांवर अशाच प्रकारच्या 40 सील भटकत आहेत. त्यांना सागरात जाण्याचा रस्ता सापडत नाही. त्यामुळे, ते रस्ते, पार्किंग आणि लोकांच्या घरांजवळ येत आहेत. अनेकांना या भुक्या आणि भटक्या सागरी जीवांना पाहून दया येत आहे.


ही समस्या सोडविण्यासाठी लोकांनी सरकारकडे मदत म्हणून दोऱ्या मागितल्या आहेत. किमान दोऱ्यांनी या सागरी जीवांना ओढून पाण्यात तरी सोडता येईल. असेच फिरत राहिल्यास भुकेने त्यांचा मृत्यू होईल. अशा प्रकारचे दृश्य यापूर्वी कधीच पाहिलेले नाहीत असे स्थानिक म्हणत आहेत. तर दुसरीकडे, अधिकाऱ्यांनी लोकांना आश्वस्त केले आहे की सागरी सीलचा लोकांच्या जीवाला काहीच धोका नाही. तसेच यापूर्वी अशाच प्रकारे कित्येक सील भटकून शहरात आल्या होत्या. त्या भुकेने ओरडत असल्याने नागरिकांना त्यांची भीती वाटत आहे. त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी सर्वच उपाय-योजना केल्या जातील. 

बातम्या आणखी आहेत...