आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI कडून ग्राहकांना मोठी भेट: व्याजदरांत 0.10% ने केली कपात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. बँकेने सर्व कालावधी कर्जाच्या व्याजदरात 0.10% ने कपात केली आहे. एक वर्षाचा मार्जिनल कॉस्ट फंड आधारित कर्ज दर (एमसीएलआर) आता 8.25% ऐवजी 8.15% होणार आहे. एसबीआयची कर्जे एमसीएलआरशी जोडलेली आहेत. एमसीएलआरमधील 0.10% कपातीमुळे 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्जावरील व्याजदर 8.40% कमी करून 8.30% होणार आहे. 10 सप्टेंबरपासून हे नवीन व्याजदर लागू होणार आहेत. सोमवारी बँकेने ही माहिती दिली. 
 

एमसीएलआर काय आहे?
एसबीआय 2016 पासून एमसीएलआरच्या आधारावर कर्ज देत आहे. ऑपरेटिंग खर्च आणि रोख राखीव प्रमाण राखणे यासारख्या गरजा लक्षात घेऊन बँका एमसीएलआर निश्चित करतात. एसबीआय मालमत्तेच्या मूल्यापेक्षा कर्जाची रक्कम आणि ग्राहकांचा क्रेडिट स्कोअरच्या आधारावर वेगवेगळ्या किमतीच्या गृह कर्जावर एमसीएलआर व्यतिरिक्त 0.10% ते 1.5% अधिक व्याज आकारते. 
> एसबीआयने चालू आर्थिक वर्षांत तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. ठेवींवरील दर कमी करण्यासाठी बँकेने अधिशेष लिक्विडिटी असल्याचे सांगितले.
 
 

बातम्या आणखी आहेत...