आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट बँकेच्या समभागात 39 महिन्यांत सर्वात मोठी घसरण, येस बँकेचे समभाग 56 टक्के आपटले

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मुंबई - कोरोना विषाणूवर पसरलेल्या भीतीदायक वातावरणात शुक्रवारी जागतिक बाजारांत विक्रीचा कल राहिल्याने येथील शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये ८९४ अंकांची मोठी घसरण झाली. याशिवाय खासगी क्षेत्रातील येस बँकेवर नियामकीय निर्बंधामुळे बाजाराची धारणा प्रभावित झाली. मुंबई शेअर बाजारादम्यान एक वेळ १,४५९ अंक खाली आला होता. अखेरीस ८९३.९९ अंक किंवा २.३२ टक्के नुकसानीत ३७,५७६.६२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७९.५५ अंकांवर बंद झाला. गुरुवारी स्टेट बँक एलआयसीसोबत मिळून संकटातील येस बँकेची ४९ टक्के हिस्सेदारी खरेदी करू शकते, असे वृत्त आले. त्यामुळे एक वेळ एसबीआयचे समभाग ७ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध लावले. यामुळे शुक्रवारी बीएसईमध्ये येस बँकेचा समभाग ५६.०४ टक्के कोसळून १६.२० पातळीवर आला. 

शेअर बाजारातील घसरणीची ४ कारणे
१. कोरोना विषाणू : कोेरोनामुळे आशिया प्रशांत देशांतून या वर्षी २१,१०० कोटी डॉलर साफ होऊ शकतात. जागतिक अर्थव्यवस्थेला २ लाख कोटी डॉलरचा झटका बसू शकतो.  
२. येस बँक संकट : रिझर्व्ह बँकेने बॅड लोनच्या समस्येशी सामना करणाऱ्या येस बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. यामुळे येस बँकेचे समभाग घसरले, बँकिंग प्रणालीही प्रभावित झाली. 
३. पैसे काढण्यात एफआयआय : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार(एफआयआय) गेल्या १४ सत्रांत एफआयआयने १८,३४३ कोटी रु. काढले. २४ फेब्रुपासून ते नेट सेलर आहेत.
४. जागतिक बाजारपेठ परिणाम : सध्या अमेरिकेसह तमाम विकसित आणि विकसनशील देशांचे शेअर बाजार दबावात आहेत. याचा परिणाम भारतीय बाजारांवरही पडत आहे.

बातम्या आणखी आहेत...