आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा- तेलंगणामध्ये विधानसभेसाठी मे 2014 मध्ये सर्वात आधी निवडणुका झाल्या होत्या.
- राज्यपाल नरसिम्हन यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय मंजूर केला.
हैदराबाद - तेलंगणाचे मुख्यमंक्षी के चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी राज्यपाल ईएल नरसिम्हन यांना माहिती दिली. राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा निर्णय मंजूर केला असून नवे सरकार स्थापन होईपर्यंत केसीआर यांनाच प्रभारी मुख्यमंत्रीपद सांभाळण्यास सांगितले आहे. केसीआर यांनी ठरलेल्या वेळेआधी निवडणुका व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे.
राज्यपालांची बेट घेतल्यानंतर केसीआर यांनी सांगितले की, पक्ष आज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 105 उमेदवारांची घोषणा करेल. तेलंगणामध्ये पहिल्या विधानसभेसाठी मे 2014 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. विधानसभेचा कार्यकाळ मे 2019 मध्ये पूर्ण होत आहे. पण राव यांना लोकसभा निवडणुकांबरोबर विधानसभा निवडणुका नको होत्या. तर वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या चार राज्यांच्या निवडणुकांबरोबर निवडणुका व्हाव्या अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
टीआरएसच्या रॅलीत मिळाले होते संकेत
रविवारी तेलंगणा राज्याच्या स्थापनेच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) ने रंगारेड्डी जिल्ह्यात सभा घेतली होती. त्यात केसीआर विधानसभा बरखास्त करण्याची घोषणा करतील असी शक्यता होती. पण तसे झाले नाही.
शहा कार्यकर्त्यांना म्हणाले होते तयार राहा
भाजपाध्यक्ष अमित शहांनी नुकतेच पक्षातील नेत्यांना तेलंगणा विधानसभा निवडणूक वर्षाच्या अखेरीपर्यंत होण्याचे संकेत दिले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना वेळेआधी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्यासही सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.