Home | Maharashtra | Pune | state government has created new questions: Ashok Chavan

साेडवण्याएेवजी राज्य सरकारने नवे प्रश्न निर्माण केले : अशाेक चव्हाण

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 07:43 AM IST

‘राज्यातील शिवसेना-भाजपच्या नाकर्त्या सरकारने जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी चिघळवत ठेवून नवीन प्रश्न निर्माण केले’

  • state government has created new questions: Ashok Chavan

    सांगली- ‘राज्यातील शिवसेना-भाजपच्या नाकर्त्या सरकारने जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी चिघळवत ठेवून नवीन प्रश्न निर्माण केले’, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा रविवारी तिसऱ्या दिवशी जत (जि. सांगली) येथे अाली. या वेळी नेत्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले.


    जत येथील सभेत चव्हाण म्हणाले, ‘सत्ता आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले हाेतेे. मात्र, साडेतीन वर्षांत शेकडो कॅबिनेट होऊनही आरक्षण दिले नाही. कर्जमाफीची घोषणा करून दोन वर्षे झाली, अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. शेतीमालाला भाव नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत. तरुणांना रोजगार नाही. मराठा व मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाबाबत सरकार चालढकल करून जाणीवपूर्वक हा प्रश्न चिघळवला जात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी नवीन प्रश्न निर्माण करण्याचेच काम सरकार करत आहे. या सरकारला सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत.’


    विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीत आतापर्यंत फक्त १४ हजार कोटीच मिळाले. या भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

Trending