आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Health Emergency Declared In Kerala, Keeping 1800 People Under Surveillance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केरळमध्ये राज्य आरोग्य आणीबाणी जाहीर, 1800 लोकांना निरीक्षणाखाली ठेवले; चीनमध्ये 426 जण दगावले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळमध्ये सोमवारपर्यंत 3 प्रकरणांची पुष्टी, 1800 लोकांना घरात निरीक्षणाखाली ठेवले
  • चीनमध्ये 15 हून अधिक शहर लॉकडाउन, हुबेई प्रांतात मंगळवारपर्यंत 414 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली/हुबेई - चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मंगळवारपर्यंत 426 जण दगावले आहेत. स्थानिक मीडियानुसार, देशात आतापर्यंत 20,383 नवीन प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे केरळ सरकारने सोमवारी कोरोना व्हायरसला राज्य आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. केरळमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसची तीन प्रकरणे समोर आली आहे. काही लोक तीन दिवसांपूर्वी चीनच्या वुहान प्रांतातून भारतात परतले होते. तब्बल 1800 लोकांना त्यांच्या घरात निगरानीखाली ठेवण्यात आले आहे. चीनमध्ये 15 हून अधिक शहरांत लॉकडाउन करण्यात आले आहे. 6 कोटी लोकांच्या ये-जा वर बंदी घातली आहे. 5 लोकांमध्ये कफ आणि सर्दीची लक्षणे आढळली


चीनहून आलेल्या सर्व भारतीयांपैकी 5 लोकांमध्ये रविवारी कफ आणि सर्दीची लक्षणे आढळली. त्यानंतर त्यांना अधिक चांगले निरीक्षण आणि उपचारांसाठी दिल्ली कॅंटच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांचे नमुने एम्सकडे पाठवले होते. त्यातील एका व्यक्तीचा नमुना निगेटिव्ह आला तर इतर चौघांचा अहवाल अद्याप आलेला नाही. 

भारताने मंत्र्यांचा गट स्थापन केला

भारतात सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री हरदीप पुरी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राज्यमंत्री जी किशन रेड्डी, अश्विनी कुमार चौबे आणि मनसुख लाल यांचा एक गट तयार केला आहे. ते कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्याच्या तयारीचे सतत पुनरावलोकन आणि परिस्थितीचे परीक्षण करणार आहेत. 

अनेक देशांनी आपल्या लोकांना चीनमधून परत आणले 


अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर यांनी अलीकडेच चीन दौर्‍यावरुन आलेल्या इतर देशांतील नागरिकांच्या येण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. व्हिएतनामने देखील चीनवरून ये-जा करणारे सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. रशियाने 3 फेब्रुवारीपासून चीनसोबत रेल्वे सेवा निलंबित केली आहे. भारत, अमेरिका, जर्मनी, इराण आणि श्रीलंकासह इतर अनेक देशांनी चीनमधून आपल्या नागिरकांना परत आणले. आहे.