Home | Maharashtra | Mumbai | State Minister Arjun khotkar on contest jalna loksabha Election

जालन्याचा फैसला उद्या औरंगाबादेत.. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित जाहीर करणार निर्णय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 04:06 PM IST

दुसरीकडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील मातोश्रीवर पोहोचल्या आहेत.

 • State Minister Arjun khotkar on contest jalna loksabha Election

  मुंबई- भाजपने जालन्यातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी दिली असली तरी जालन्याचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर जालन्यातून लोकसभा लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. यावर तोडगा काढण्यासंदर्भात अर्जुन खोतकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांची बैठक संपली असून जालन्याच्या जागेबाबत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित औरंगाबादमधील बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

  जालन्याचा तिढा 'मातोश्री'वरही सुटला नाही..

  जालन्याच्या तिढ्यावर 'मातोश्रीवर शनिवारी झालेल्या बैठकीतही अंतिम तोडगा निघाला नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील शनिवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे, अर्जुन खोतकर आणि पंकजा मुंडे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली.

  दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी तयार केली आहे. त्यात जालन्यातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांचे समर्थक नाराज झाले आहेत.

  औरंगाबादेत युतीचा मेळावा

  औरंगाबादेत उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप युतीचा दुसरा मेळावा होत आहे. त्याआधी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक होणार आहे. त्यात दानवे-खोतकर मनोमीलन घडविले जाण्याची शक्यता आहे.

 • State Minister Arjun khotkar on contest jalna loksabha Election

Trending