आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक निकामी; एसआरपीएफची व्हॅन उलटून 20 जवान जखमी, पुसद तालुक्यातील सांडवा शिवारातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद - हिंगोली येथून गडचिरोलीकडे नक्षली बंदोबस्तासाठी जात असलेल्या राज्य राखीव दलाच्या व्हॅनचे ब्रेक फेल व्हॅन रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात २० जवान जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता पुसद तालुक्यातील सांडवा परिसरात घडली. 


राज्यात नक्षलग्रस्त नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात राज्य राखीव दलाचा बंदोबस्त कायम असतो. त्यासाठी मराठवाड्यातील हिंगोली स्थित असलेल्या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण मुख्यालयातून ४ ते ५ तुकडी आळीपाळीने गडचिरोली येथे तैनातीसाठी पाठविण्यात येत असतात. प्रत्येक तुकडीत ३५ जवानांचा समावेश असतो. त्या अनुशंगाने शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हिंगोली येथून एसआरपीएफ जवान एमएच-३८ जी-०३०८ या वाहनाने गडचिरोलीसाठी रवाना झाले होते. पुसद तालुक्यातील शेंबालपिंप्री ते पुसद दरम्यान सांडवा घाटात वाहनाचे ब्रेक अचानक फेल झाल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी वाहनातील सर्व जवानांना ही बाब सांगत सावध केले होते हे विशेष.. मात्र, घाटातील अरुंद रस्त्याच्या बाजूने टेकडीलगत असलेल्या दरडीमुळे लॉरी कोसळली. चालकाच्या सावधतेमुळे जनतेच्या सुरक्षेचा हमी उचललेल्या जवानांचे प्राण बचावले. ही बाब कळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. दरम्यान जखमी जवानांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज्य राखीव दलाचे सचिन पवार, भगवान चव्हाण, ए.सी.गायकवाड, एन.के.भातुरी, राजेश फुलावरे, के.व्ही.चौधरी, एन.एस.मोरे, आर.डी.सातव यांच्यासह इतर जखमी झाले. 

बातम्या आणखी आहेत...