आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिणेच्या ५ राज्यांत प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व घटले; तरीही १३२ पैकी सर्वाधिक ७२ जागा यांनाच मिळाल्या, भाजपने पूर्वेत वाढवल्या ४४ जागा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केवळ दक्षिणेत प्रादेशिक पक्ष स्वत:चा बालेकिल्ला वाचवू शकले. या भागातील १३२ पैकी ७२ जागा याच पक्षांना मिळाल्या. तामिळनाडूत ३९ पैकी ३२ जागा जिंकून द्रमुक सर्वात माेठा पक्ष बनला आहे. दक्षिणेत भाजपची कामगिरी सर्वात वाईट व काॅंग्रेसची सर्वात चांगली राहिली. तामिलनाडू, आंध्र व केरळमध्ये भाजप खाते उघडू शकला नाही, तर काॅंग्रेसला सर्वाधिक ३४ जागा येथूनच व देशभरात एकूण ५१ जागाच मिळाल्या. भाजपला ओडिशा व बंगालमध्ये चारवरून दुसऱ्या क्रमांकावर मजल मारण्यात यश आले आहे. 

 

भाजपने उत्तर, पश्चिम, मध्यच्या ९०%पैकी जास्त जागा जिंकल्या

या निवडणुकीत काॅंग्रेस हा केवळ दक्षिणेकडील पक्ष बनला असून, उत्तर, पूर्व, पश्चिम भारतात पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसला सर्वात जास्त ३४ जागा दक्षिणेतच मिळाल्या आहेत. 

 

पूर्व भारत ; भाजपला पूर्वेमध्ये सर्वात जास्त मताधिक्य, ४४ जागा वाढवल्या 

भाजप + 89 (+44), काँग्रेस + 10 (-4), इतर 43 (-40)

पूर्व भारतात ‘कमळ’ चांगलेच फुलले. तेथे प.बंगाल, आसाम यावह १२ राज्यांच्या १४२ जागा असून, त्यापैकी ८९ भाजपला मिळाल्या व याच भागातून सर्वाधिक ४४ जागांचा फायदा झाला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला तेवीसच जागा मिळाल्या. 

 

पश्चिम भारत : एनसीपी-महाराष्ट्र आघाडी एकही जागा वाढवू शकली नाही

भाजपा+ 95 (-01), कांग्रेस+ 06 (00), अन्य 02 (+1)

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, गाेवा आणि दाेन केंद्रशासित प्रदेश दीव-दमन आणि दादरा नगर हवेली या विभागातील १०३ पैकी ९५ जागा भाजपला मिळाल्या. महाराष्ट्रात कांग्रेस-एनसीपी आघाडीला मात्र काहीही फायदा झाला नाही.

 

उत्तर भारत : मोदींनी यूपीची भरपाई उत्तर भारतातील 7 राज्यांतून केली

भाजपा+ 96 (-4), कांग्रेस+ 06 (+03), अन्य 28 (+10)

उत्तर भारतात ८ राज्यांतील १२६ जागा येतात. भाजपने यापैकी ९६ जागा जिंकल्या आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला ११ जागांचे नुकसान झाले. त्याची भरपाई अन्य ७ राज्यांतून केली. काँग्रेसला ६ राज्यात खाते उघडता आले नाही.
 

दक्षिण भारत : आंध्र, केरळ आणि तामिळनाडूत भाजपला खाते उघडता आले नाही 

भाजपा+ 29 (+07), कांग्रेस+ 34 (+15), अन्य 72 (-18)

प्रादेशिक पक्षांचा प्रभाव राहिला. भाजप आंध्र, तामिळनाडू आणि केरळात खाते उघडू शकली नाही. काँग्रेसने या विभागात ३४ जागा जिंकल्या. काँग्रेसचा हा सर्वाेत्तम स्काेर ठरला. २०१४ च्या तुलनेत प्रादेशिक पक्षांच्या जागा कमी झाल्या आहेत.

 

मध्य भारत : ६ महिन्यांपूर्वी सत्तेत अालेल्या काँग्रेसला ३ जागा

भाजपा - 37 (+00), काँग्रेस - 03 (+00), अन्य- 00 (00)

सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या काँग्रेसला मध्यप्रदेश, छत्तीसगड मध्ये अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले. मध्यप्रदेशात केवळ छिंदवाडाची जागा जिंकता आली. येथे पारंपरिक जागेवर मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल विजयी झाले. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस केवळ दाेन जागांवर विजयी हाेऊ शकली. मध्यप्रदेशात गेल्या ३ निवडणुकांपासून प्रचलित कल संपुष्टात आला. येथे सत्ताधारी पक्षाला 70% पेक्षा ज्यादा जागा मिळत राहिल्या.