आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबे खाऊन पुत्र प्राप्तीचे वक्तव्य; संभाजी भिडे गुरुजी यांना जामीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- माझ्यावर आंबा प्रकरणात आरोप म्हणजे अंधार असलेल्या खोलीत काळी मांजर शोधण्याचा प्रयत्न असल्याचे  मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.  काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.   माझ्या शेतातील  आंबे खाल्ले तर पुत्रप्राप्ती होते, असे वादग्रस्त विधानप्रकरणी  शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष संभाजी भिडे यांना  अखेर जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. शुक्रवारी दुपारी भिडे न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिले. दुपारी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. येथील इंग्रजीमधील पाट्या बदलण्याच्या सूचना संस्थानाच्या विश्वस्तांना केल्या.  

 
आंबा प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात संभाजी भिडे यांच्याविरोधात महापालिकेने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत खटला दाखल केला आहे. या प्रकरणात भिडेेंना न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होती. भिडे यांना नोटीस बजावण्यात आली होती. भिडे सकाळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात न्यायालयात हजर झाले.  अॅड. अविनाश भिडे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने  भिडेंना वैयक्तिक जातमुचलक्यावर  जामीन मंजूर केला. दुपारी भिडे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. मंदिराचे  महंत सुधीर दास पुजारी यांनी मंदिराचा इतिहास सांगितला. मंदिराच्या दर्शनी  भागात असलेल्या इंग्रजीमधील  इन आणि  आऊट या पाट्या भिडे यांना खटकल्या. त्यांनी मंदिरात मराठी पाट्या लावण्याच्या सूचना विश्वस्तांना दिल्या. 


भिडे गुरुजी यांच्याविराेधात सहा महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या अाराेग्य विभागाने खटला दाखल करण्यात अाली हाेता. या प्रकरणात न्यायालयाने भिडेंना हजर राहण्याचे अादेश दिले हाेते. मात्र, सलग दाेन-तीन वेळा त्यांच्या वकिलांमार्फत प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत भिडे गुरुजी गैरहजर राहिले. त्यानंतर न्यायालयाने भिडेंच्या वतीने मनपाच्या तक्रारीला दिलेले अाव्हान फेटाळले. त्यामुळे भिडे गुरुजी यांना न्यायालयात हजर राहावे लागले.

 

अटकेची आवश्यकता नाही : बचाव पक्ष
भिडे गुरुजी यांच्या वतीने अॅड. अविनाश भिडे यांनी युक्तिवाद करीत, ‘गुरुजींचे वय ८७ वर्षे असून त्यांच्या भाषणाची रेकाॅर्डिंग व इतर पुरावे न्यायालयात दाखल असताना त्यांच्या अटकेची अावश्यकता नाही’, जामीन मिळण्याची मागणी केली. न्यायालयाने जामीन मंजूर करीत पुढील सुनावणी १४ डिसेंबर राेजी ठेवली.

बातम्या आणखी आहेत...