दिल्ली निवडणूक / 'गोली मारो आणि भारत-पाक मॅच'सारख्या वक्तव्यांनी आमचा घात केला, निवडणुकीनंतर अमित शाह यांची प्रतिक्रीया

  • भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी भारत-पाक मॅचचे ट्वीट केले होते, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी 'गोली मारो' घोषणा दिल्या होत्या

दिव्य मराठी वेब टीम

Feb 13,2020 09:28:00 PM IST

नवी दिल्ली- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज(गुरुवार) दिल्ली विधानसभा निवडणुकीवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, ‘गोली मारो’ आणि ‘भारत-पाक मॅच’ सारखे वक्तव्य द्यायला नको होते. अशा घटनांमुळे पक्षाचा घात केला. आमच्या पक्षाने अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे स्वतःला दूर केले आहे.

अमित शाह एका वृत वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांना भाजप नेत्यांकडून देण्यात आलेल्या या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. दिल्ली निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवार कपिल मिश्रा यांनी 8 फेब्रुवारीला भारत-पाक सामन्या सारखे वातावरण असेल आणि केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकुर यांनी एका सभेदरम्यान गोळी मारो सारखे वक्तव्य केले होते.


विचारधारेला पुढे नेण्याचा निवडणुकीचा उद्देश आहे -अमित शाह


शाह पुढे म्हणाले की, दिल्ली निवडणूक आम्ही फक्त जिंकणे किंवा हारण्यासाठी लढला नाही. आमच्या विचारधारेचा प्रसार करण्याचा आमचा उद्देश होता. यावेळी त्यांनी आपल्या काही नेत्यांमुळे पक्षाला नुकसान झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, या सर्व गोष्ठींमुळे आमच्या निवडणुकीवर परिणाम झाला.

'शांतिपूर्ण आंदोलन अधिकार, पळ हिंसा मान्य नाही'


पुढे ते म्हणाले की, एनआरसीला संपूर्ण देशात लागू करण्याचा सरकारने अद्याप विचार केला नाही. नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर (एनपीआर) च्या प्रक्रियेदरम्यान एखाद्याला आपले कागदपत्र दाखवायचे नसतील तर, तो त्याचा अधिकार आहे. एनआरसीचा मुद्दा भाजपच्या घोषणापत्रात नव्हता. अहिंसक आणि शांतिपूर्ण आंदोलन सहन केले जातील, पण हिंसा आणि तोडफोड मान्य नाही.

X