political / मारबत मिरवणुकीत इम्रान खान, चिदंबरम यांचे बडगे 

नागपूरकारांनी हजारोंच्या संख्येने या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला.

Sep 01,2019 09:41:00 AM IST

नागपूर : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा स्वागतार्ह निर्णय, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, पी. चिदंबरम यांना भ्रष्टाचारप्रकरणी झालेली अटक, देशातील बेरोजगारी अशा विविध विषयांवर उपासाहात्मक भाष्य करणारे बडगे (पुतळे) शनिवारी नागपुरात पार पडलेल्या बडगा मारबत मिरवणुकीत सहभागी झाले होते. नागपूरकारांनी हजारोंच्या संख्येने या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला.

तान्हा पोळ्याच्या दिवशी नागपुरात मारबत बडग्यांची मिरवणूक काढण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. इंग्रजांना मदत करणाऱ्या भोसलेकालीन बाकाबाईचा निषेध म्हणून काळी आणि पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. याशिवाय समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरा, संकटे, भ्रष्टाचार अशा विविध घटनांवर भाष्य करणारे बडगेही या मिरवणुकीत सहभागी केले जातात. मुसळधार पावसाचा मात्र शेवटच्या टप्प्यात या मिरवणुकीला फटका बसला

X