आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलवरून बँक खात्याची माहिती घेऊन महिलेला अडीच लाखांचा गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी- बँकेच्या मुंबई येथील ग्राहक सेवा केंद्रातून (कस्टमर केअर) बोलतोय, असे सांगून महिलेच्या बँक खात्याची माहिती घेत त्यातून दोन लाख ४६ हजार ९६६ रुपये काढून घेण्यात आले. महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा नानाभाऊ धेंडुळे (वय २९, रा. उपळाई रोड, गोंदिल प्लॉट, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.

 

आशा व त्यांचे पती नोकरी करतात. आशा यांचे आयसीआयसीआय बँकेत लातूर येथील औसा रोड शाखेत खाते आहे. शुक्रवारी सकाळी त्या बार्शीत घरी असताना त्यांना ९९३९०१७०७३, ९०६४१८३२२७ या क्रमांकांवरून त्यांना फोन आला. आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलतोय, असे सांगून त्यांना बँक खात्याची माहिती विचारली. आशा यांनी ती माहिती दिली. १५ ते २० मिनिटांनी खात्यातील पैसे कमी होऊ लागले व आशा यांच्या मोबाइलवर मेसेज येऊ लागले.

 

घाबरलेल्या आशा यांनी तत्काळ येथील आयसीआयसीआय बँक गाठून व्यवस्थापकांना याबाबतची माहिती दिली. व्यवस्थापकांनी त्यांना अकाउंट स्टेटमेंट दिले. अकाउंटवरील ३ लाख ४६ हजार ९७०.५० पैकी २ लाख ४६ हजार ९६६ कमी झाल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...