आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवा मुलीवर सावत्र बापाच करत होता असे काही, म्हणाला- एकतर लग्न कर, नाहीतर रोज फक्त 2 तास ये!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवबंद (यूपी) - येथे बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उजेडात आली आहे. सावत्र बापाने आपल्या विधवा मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने या कृत्यासाठी बापाला विरोधही केला. यानंतर मात्र आरोपी बाप तिच्यासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागला. तिने आणखी विरोध केल्यावर या नराधमाने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. आता पीडितेने पोलिसांत धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची विनवणी केली आहे. पोलिसांनीही आधी तिला पिटाळून लावले, खूप खेटे मारल्यानंतर तिची तक्रार ऐकण्यात आली.


आईला दिला घटस्फोट, मग मुलीवर टाकला लग्नाचा दबाव
सहारनपूरच्या देवबंदची रहिवासी असलेल्या विधवा मुलीने आपल्या सावत्र बापाविरुद्ध पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. यात तिने आरोप केला की, तिच्या सावत्र बापाने आईला तलाक दिला. यानंतर पीडिताही आपल्या आईसोबत वेगळी राहत होती. पीडितेने सांगितल्यानुसार, आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तिला मोलमजुरी करावी लागते. तिचा सावत्र बाप तिला फोन करून धमक्या देत होता. आपल्यासोबत निकाह करण्याचा दबाव टाकत होता.

 

बाप म्हणाला- एकतर लग्न कर, नाहीतर फक्त 2 तास दे
पीडितेच्या तक्रारीनुसार, नुकतीच ती आपल्या नातेवाइकांच्या लग्नात गेली होती. तेथे तिच्या सावत्र बापाने तिला बोलावले. तेव्हा बापाने तिला लग्नाची मागणी घातली. एवढेच नाही, जेव्हा मुलीने स्पष्ट नकार दिला तेव्हा सावत्र बापाने तिला दररोज फक्त 2 तास ये, मी तुला 5000 रुपये देईन, अशी घाण ऑफरही दिली. पीडिता म्हणाली की, असे न केल्यास सावत्र बापाने माझ्या आई-बहीणभावांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. यानंतर पीडिता जेव्हा पोलिसांत गेली तेव्हा तिची तक्रार ऐकून घेण्याऐवजी आधी तिला खोटे ठरवत पिटाळून लावण्यात आले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन तिने गाऱ्हाणे मांडले तेव्हा कुठे दखल घेण्यात आली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...  

 

 

बातम्या आणखी आहेत...