आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडच्‍या ठिक मृत्‍यूपुर्वी गर्लफ्रेंडने घेतली गळाभेट अन् तिच्‍या बाहुपाशात त्‍याने सोडला जीव, फोटो व्‍हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूके - एका तरूणीच्‍या फोटोची सध्‍या जगभरात चर्चा होत आहे. फोटोमध्‍ये ती आपल्‍या बॉयफ्रेंडला मिठी मारत आहे, तेही त्‍याच्‍या ठिक मृत्‍यूपूर्वी. मागील अनेक दिवसांपासून तरूणीच्‍या बॉयफ्रेंडवर हॉस्पिटलमध्‍ये उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍याची लाईफ सपोर्ट सिस्‍टीम काढून घेण्‍यात आली.  याच्‍या ठिक काही क्षणांआधी तरूणीने आपल्‍या बॉयफ्रेंडला मिठी मारली व तरूणाने तिच्‍या बाहुपाशात आपला जीव सोडला.  


नेमके काय आहे प्रकरण
- यूकेतील डूडली शहरातील हे प्रकरण आहे.  येथे राहणारी 15 वर्षीय स्‍टेफनी आणि 16 वर्षीय ब्‍लेक वार्ड लहानपणापासून सोबत होते. दोघेही एकमेकांच्‍या प्रेमात होते.
- मागील मंगळवारी ब्‍लेक आपल्‍या कुटुंबियांसोबत सुट्टयांसाठी वेल्‍सच्‍या फेमस सी-बीचवर गेला होता. येथे समुद्रात पोहत असताना तो बुडाला. एअर लिफ्टच्‍या साहाय्याने त्‍याला वाचवण्‍यात आले.
- लिवरपूल येथील चिल्‍ड्रन हॉस्पिटलमध्‍ये त्‍याच्‍यावर अनेक दिवस लाइफ सपोर्ट सिस्‍टीमवर ठेऊन उपचार करण्‍यात आले.  मात्र त्‍याच्‍या मेंदूने काम करणे पुर्णपणे थांबवले होते. त्‍यामुळे अखेर डॉक्‍टरांनी त्‍याचे लाइफ सपोर्ट सिस्‍टीम काढून घेतले व त्‍याचा मृत्‍यू झाला.
- यापूर्वी त्‍याची गर्लफ्रेंड स्‍टेफनीने त्‍याची गळाभेट घेतली. त्‍याच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याच्‍याबद्दलच्‍या भावना स्‍टेफनीने सोशल मीडियावर शेअर केल्‍या आहेत.


स्‍टेफनीने लिहिला इमोशनल मॅसेज
- 'आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात कठिण दिवस आहे. या दिवसाला मी कधीही विसरू शकत नाही. तुमच्‍यापैकी काही जणांना माहिती असेल की, मंगळवारी ब्‍लॅकचा गंभीर अपघात झाला होता.'
- नंतर त्‍याला रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले तेव्‍हा या सर्व काळादरम्‍यान मी त्‍याच्‍यासोबत होते. ब्‍लॅक हा इतरांची काळजी व इतरांवर प्रेम करणारा व्‍यक्‍ती होता. मदतीसाठी तो नेहमी तयार राहत असे.
- काल आम्‍हाला सांगण्‍यात आले की, ब्‍लॅकच्‍या मेंदूने काम करणे पुर्णपणे बंद केले आहे. त्‍यामुळे आम्‍हाला त्‍याची लाइफ सपोर्ट सिस्‍टीम काढून घेण्‍याचा अत्‍यंत कठिण निर्णय घ्‍यावा लागला. जेणेकरून त्‍याला आणखी त्रास सहन करावा लागणार नाही व तो शांतपणे आमचा निरोप घेऊ शकेल.
- ब्‍लॅक माझ्यासाठी खास व्‍यक्‍ती होता. आम्‍ही एकमेकांसोबत अनेक मौल्‍यवान क्षण जगलो आहोत. जीवनातील अनेक चढ-उतार आम्‍ही एकत्र पाहिले. आणि नेहमी सोबत या सर्वांना पार करून आम्‍ही पुढे जात राहिलो.
- ब्‍लॅक गेला तेव्‍हा पुर्ण कुटुंब त्‍यांच्‍यासोबत होते. त्‍याला कोणीही विसरू शकत नाही. माझ्या ह्रदयात नेहमी त्‍याच्‍यासाठी एक खास जागा राहिल. मी तुला कधीही विसरू शकणार नाही ब्‍लॅक. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि नेहमी राहिल.  

 

बातम्या आणखी आहेत...