आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2019 : धोनी चांगल्या फॉर्मात, चौथ्या क्रमांकावरच मारणार 'चौकार' - स्टीफन फ्लेमिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चेन्नई - आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना कर्णधार महेंद्र सिंग धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी ही माहिती दिली. गत हंगामातही धोनीने चौथ्याच क्रमांकावर फलंदाजी केली होती. धोनी उत्तम फॉर्मात असल्याची स्तुतीसुमनेही प्रशिक्षकांनी उधळली. ते २००९ पासून चेन्नईचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी तीनदा चेन्नईला आयपीएलचा विजेता बनवले. त्याआधी म्हणजे २००८ मध्ये ते चेन्नईचे सलामीवीर होते. 

 

मानसिकता आणि वातावरण हेच विजयाचे गुपित : 
फ्लेमिंग यांनी सांगितले, 'धोनी गेल्या दहा महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये आहे. आमच्याकडे केदार जाधवच्या रुपात उमदा फलंदाज आहे. आम्ही आमच्या फलंदाजीच्या क्रमवारीवर आनंदी आहोत.' गत हंगामातील विजयाचे श्रेय त्यांनी संघाची मानसिकता, वातावरण आणि संतुलनाला दिले. ते म्हणाले, जर तुम्ही दुसऱ्या संघाकडे पाहाल तर आपले चांगले आणि वाईट पैलू निदर्शनास येतील. प्रत्येक संघाकडे शानदार खेळाडू आहेत. केवळ मानसिकता, संघातील वातावरण आणि मोक्याच्या वेळी कोण बाजी मारतो, यावर सारे काही अवलंबून आहे. 

 

मेलबर्न स्टार्सच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा 
फ्लेमिंग यांनी ऑस्ट्रेलियाच्या टी-२० लीगमधील संघ मेलबर्न स्टार्सच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. ते २०१५ पासून या संघाचे प्रशिक्षक होते. फ्लेमिंग यांच्या मार्गदर्शनात चेन्नईने तीनदा विजेतेपद मिळवले होते. दुसरीकडे मेलबर्न संघाला २०१५ च्या अंतिम फेरीत पराभवाचा धक्का बसला होता. 

बातम्या आणखी आहेत...