आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाश : मनुष्याच्या DNA शी छेडछाड करून निर्माण होतील दानव, जगात माजू शकतो हाहाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगातील प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिन्स यांच्या मृत्यूच्या सात महिन्यानंतर त्यांची शेवटची एक भविष्यवाणी समोर आली आहे. 'स्टीफन हॉकिन्स फायनरल फिअर' पुस्तकामध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या भीतीविषयी लिहिण्यात आले आहे. आपल्या शेवटच्या भविष्यवाणीमध्ये प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन यांनी भीती व्यक्त केली आहे की, डीएनए इंजिनिअरिंगमध्ये छेडछाड करून नवीन प्रजाती निर्माण करण्याचा प्रयत्न राक्षसांना जन्म देईल, जे मनुष्य जातीला नष्ट करतील.


मृत्यूपूर्वी लिहीत होते पुस्तक 
मार्च महिन्यात स्टीफन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. या काळात ते एक पुस्तक लिहीत होते. हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते. परंतु त्यांचे हे अपूर्ण पुस्तक आता मंगळवारी पब्लिश होत आहे.


मनुष्याला केले जाईल मॉडिफाइड 
हॉकिंग यांनी लिहिले आहे की, "मला संपूर्ण विश्वास आहे की, या शतकात मनुष्याला शरीराच्या विविध विशेषता कशा वाढवता येतील याविषयी समजेल. डीएनए मॉडिफिकेशनच्या माध्यमातून मनुष्यामध्ये विविध बदल केले जातील. उदा. स्मरणशक्ती वाढवणे, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे, आक्रमकता किंवा लडाखू बनवणे यासारखे विविध प्रयोग केले जातील परंतु हे अतिशय भयानक ठरतील.


कायदे तयार होतील परंतु रोखू शकणार नाहीत 
- स्टीफन यांनी पुढे लिहिले आहे की, डीएनए इंजिनिअरिंगचा धोका वैज्ञानिकांना माहिती आहे. यामुळे यासाठी कायदाही तयार केला जाईल परंतु याला कोणीही रोखू शकणार नाही. असे अशामुळे घडेल कारण स्वतःला सुपरह्युमन बनवण्याचा लोभ यांना आकर्षित करत राहील आणि कायदा मोडत राहील.'


कदाचित मृत्यूलाही रोखू शकू
- स्टीफन यांनी लिहिले आहे की, कदाचित डीएनएमध्ये बदल करून आपण काही काळासाठी मृत्यूला टाळू. या सर्व विशेषता असलेल्या लोकांना सुपर ह्युमन मानले जाईल. परंतु यांची संख्या वाढल्यानंतर पृथ्वीवर संकट येईल. यांचा इतर मनुष्यांशी ताळमेळ बसणार नाही आणि येथूनच विनाशाची सुरुवात होईल. सुपरह्यूमन इतर मनुष्यांना बिनकामी समजून नष्ट करू लागतील.

बातम्या आणखी आहेत...