आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Steve Irwin Son Robert Clarence Irwin Share Picture With Same Place, Same Crocodile

स्टीव इर्विनच्या मुलाने मगरीसोबतचा फोटो केला पोस्ट, वडिलांनी 15 वर्षांपूर्वी त्याच मगरीसोबत तसाच फोटो शेअर केला होता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- जगातील नावजलेले वाईल्ड लाईफ एक्सपर्ट तसेच जगात मगरींबद्दल कोणाला जास्त माहिती असेल तर, ते म्हणजे ऑस्ट्रेलियातले स्टीव इर्विन. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सरपटणाऱ्या प्राण्यांसोबत घालवले. आता त्यांचा मुलगा रॉबर्ट क्लेरेंसदेखील त्यांच्याच मार्गावर चालत आहे. रॉबर्टने आपल्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी त्याच मगरीसोबत तसाच फोटो पोस्ट केला, जसा 15 वर्षांपूर्वी स्टीवने केला होता.


मगरीचे नाव मरे आहे
विशेष बाब म्हणजे 15 वर्षांपूर्वी स्टीवने ज्या मगरीसोबतचा फोटो शेअर केला होता, त्यांच्या मुलाने त्याच मगरीसोबत, त्याच ठिकाणी फोटो काढून शेअर केला आहे. रॉबर्टने बुधवारी हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला. मगरीचे नाव मरे आहे.

 

 

 

18 वर्षीय रॉबर्टने ट्वीट केले, "वडील आणि मी मरेला खाऊ घालत असताना. त्याच जागेवर, तीच मगर, दोन फोटो, 15 वर्षानंतर." रॉबर्ट फोटोमध्ये आपल्या वडिलांप्रमाणेच दिसत आहे. रॉबर्टने स्टीव्हप्रमाणेच कपडे आणि बुट घातले आहेत.

 

स्टीवचा 44 व्या वर्षी 4 सप्टेंबर 2006 ला मृत्यू झाला होता. समुद्रात शुटिंगदरम्यान स्टिंग रे माशाने त्यांना दंश मारला होता. तेव्हा रॉबर्ट 3 वर्षांचा होता. स्टीवची मोठी बहिण बिंदी आणि पत्नी टेरी त्यांचा झू सांभाळत आहेत. झूमध्ये अंदाजे 1200 प्राणी आहेत.

बातम्या आणखी आहेत...