Home | Jeevan Mantra | Dharm | Steve Jobs And Mark Zukerberg Also Have Faith In This temple

स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकेरबर्ग यांनीही मान्य केला आहे या मंदिराचा चमत्कार

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 11:21 AM IST

नैनीताल जवळ कैंचीमध्ये नीम करौली मातेचे मोठे प्रसिध्द मंदिर तसेच नीम करौली बाबाचा आश्रम आहे.

 • Steve Jobs And Mark Zukerberg Also Have Faith In This temple

  नैनीताल जवळ कैंचीमध्ये नीम करौली मातेचे मोठे प्रसिध्द मंदिर तसेच नीम करौली बाबाचा आश्रम आहे. हे मंदिर अनेक लोकांच्या आस्थेचे केंद्र आहे. परंतु 2017 मध्ये हे ठिकाण जास्त चर्चेत आले, जेव्हा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर या जागेचा उल्लेख केला.


  झुकेरबर्गने नरेंद्र मोदींना सांगितले की, जेव्हा फेसबुकचे वाईट दिवस सुरु होते तेव्हा ते कसे भारतात आले आणि या मंदिरातून प्रेरणा रुपी शक्ती घेऊन आज यश मिळवले. यासोबत झुकेरबर्गने सांगितले की, अॅप्पलचे संस्थापक स्टीव जॉब्सच्या सांगण्यावरुन ते येथे आले होते.


  सन्यास घेण्यासाठी आले होते स्टीव्ह जॉब्स
  स्टीव्ह जॉब्स 1973 मध्ये संन्यास घेण्याच्या उद्देशाने या मंदिरातील बाबांकडे आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र डौन कोटके होते. ते येथे नीम करौली बाबांना भेटायला आले होते. परंतु ते येण्याच्या काळी काळाअगोदर बाबांचा मृत्यू झाला होता. येथे राहून स्टीव जॉब्सने काही दिवस ध्यान-आराधना केली. येथूनच त्यांना आपल्या देशात जाऊन कंपनी स्थापन करावी अशी प्रेरणा मिळाली. येथून गेल्यानंतर जॉब्सने अॅप्पल कंपनी बनवली. ही कंपनी आज टेक्नोलॉजीसाठी जगातील दर्जेदार कंपनी मानली जाते. स्टीव जॉब्स आयुष्यभर नीम करौली बाबाचे भक्त राहीले.

  झुकेरबर्ग यांना जुकरबर्गला अडचणीतून काढले
  2004 मध्ये मार्क जुकरबर्गच्या फेसबुक कंपनीवर मोठे संकट आले होते. तेव्हा कंपनी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यावेळी झुकेरबर्गने आपले गुरु स्टीव जॉब्सला सल्ला मागितला. तेव्हा त्यांनी सांगितले की, काही दिवस भारतात जाऊन या मंदिरात वेळ घालव, हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. झुकेरबर्ग मंदिरात आले आणि येथूनच त्यांना अशी शक्ती मिळाली ज्यामुळे त्यांनी आज यश मिळवले.


  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कैंची धाम आणि नीम करौली बाबासंबंधीत खास गोष्टी...

 • Steve Jobs And Mark Zukerberg Also Have Faith In This temple

  चमत्कारी आहे येथील मंदिर आणि नीम करौली बाबा
  नैनीतालच्या भवाली-अल्मोडा हाय-वे वरील कैंची धाम मंदिरामध्ये दरवर्षी देश आणि जगभरातील लाखो भाविक येतात. येथे हनुमानाचे मंदिर आहे. आश्रमाचे नाव येथील पुजारी स्वर्गीय नीम करौली बाबाच्या नावावर पडले आहे. या परिसरात बाबांनी अनेक चमत्कार केले आहेत. हे बाबा स्वतः गायब आणि प्रकट होतात असे सांगितले जाते. तसेच येणा-या संकटांचे संकेत त्यांना कळतात.

 • Steve Jobs And Mark Zukerberg Also Have Faith In This temple

  कोण होते नीम करौली बाबा
  येथील लोक सांगतात की, नीम करोली बाबा दिव्य शक्ती असणारे संत होते. त्यांना हनुमानाची सिध्दि प्राप्त होती आणि ते त्रिकालाचे दर्शन करु शकत होते. 1973 मध्ये त्यांचे निधन झाले. नीम करौली बाबांना सुरुवातीला पंडित नारायणाच्या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या भक्तांमध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश होता. जगभरातील अनेक विदेशी नागरिकसुध्दा या आश्रमात येतात. स्टीव जॉब्स आणि मार्क जुकरबर्गव्यतिरिक्त हॉलीवुडची टॉप अॅक्ट्रेस जूलिया रॉबटर्ससुध्दा नीम करौली बाबाची भक्त आहे.

Trending