आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Steve Waugh Compares Virat Kohli To Sachin Tendulkar And Brian Lara, Calls Him A Great Player

स्टीव्ह वॉने सचिन, लारासोबत केली विराटची तुलना; म्हणाला, कोहली एक महान क्रिकेटर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहली नुकताच एका चुकीच्या वक्तव्यामुळे स्पॉटलाइटमध्ये आला होता. त्याने क्रिकेट प्रेमीला विचारले होते- जर तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या आणि इंग्लंडच्या प्लेअरबद्दल आपुलकी असेल तर तुम्ही भारत देश सोडून तिकडे राहावे. यानंतर सोशल मिडियावर विराटला टीकेचा सामना करावा लागला. विराट पुन्हा चर्चेत आहे. परंतु, यावेळी कारण दुसरेच आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटर स्टीव्ह वॉने विराटची तुलना सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारासोबत केली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोबरोबर झालेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, "तो एक चांगला खेळाडू आहे. इतका मोठा पल्ला गाठण्यासाठी त्याने तेंडुलकर आणि लारा प्रमाणे खूप मेहनत घेतली आहे. तो एक चांगला बॅट्समन आहे आणि त्याने मेहनत घेतल्यावर तो अजुन चांगले प्रदर्शन करू शकतो.

 

- अलीकडेच टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले की, सध्या कोहलीच्या नेतृत्वाखाली असलेला संघ गेल्या 15 वर्षांतील भारतीय संघापैकी सर्वोत्तम आहे. पण, वॅाने शास्त्री यांचे विधान खोडून काढले. तो म्हणाला, मागच्या काही मालिका पाहिल्यानंतर मला वाटत नाही की, सध्याचा भारतीय संघ सर्वोत्तम आहे.

- "पुढे बोलताना वॅा म्हणाले की, मी अनेक भारतीय संघा विरूद्ध खेळलो आहे आणि आताच्या संघाने त्या वेळेसच्या संघांइतकी सर्वोत्तम कामगिरी केलेली नाहि. पण मला हेही माहीती आहे की, शास्त्री यांनी संघाचे मनोबल वाढवण्यासाठी हे विधान केले असावे. पण मला वाटते की, अशा चुकीची वक्तव्ये त्यांनी टाळावीत." 

- "असे वक्तव्य केल्यामुळे संघावर दबाव पडून संघाच्या कामगिरिवर त्याचा परिणाम होतो. आणि त्यानंतर संघावर खुप टिका केली जाते. मला वाटते की, त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये जाहीर न करता स्वत:पुरती मर्यादीत ठेवावीत." रागीट स्वभावाच्या माजी भारतीय कर्णधाराला वाटते की, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करेल. पण असे होणार नाही.

- "ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे भारतीय संघाला कठिण जाणार आहे. आमच्याकडे जगातील कोणत्याच संघाकडे नसतील इतके यशस्वी गोलंदाज आहेत.  जर प्रथम फलंदाजीत आम्ही 350 धावा केल्या, तर आम्हाला पराभूत करणे अशक्य आहे." असा दावा त्याने केला.

बातम्या आणखी आहेत...