Home | Maharashtra | Mumbai | STI squad in Palghar for Govind Pansare murder

पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध; पालघरमध्ये एसआयटी स्थापन

विशेष प्रतिनिधी | Update - Apr 16, 2019, 08:56 AM IST

उच्च न्यायालयानेही तपास यंत्रणेवर निष्क्रियतेचा ठपका ठेवला

  • STI squad in Palghar for Govind Pansare murder
    मुंबई- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील मुख्य आरोपींना शोधण्यासाठी आता पालघर जिल्ह्यात विशेष पोलिस पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांचे एक विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत असून आता कोल्हापूरच्या अप्पर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार पालघर येथेही एसआयटी बनवली आहे. गेल्यावर्षी नालासोपारा येथून हिंदू जनजागृती समितीच्या काही कार्यकर्त्यांकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला होता. या प्रकरणाचे धागेदाेरे थेट पानसरे हत्या प्रकरणापर्यंत पोहोचल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर पालघर येथे विशेष तपास पथकाची स्थापना करणे, हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला चार वर्षे उलटून गेल्यानंतरही तपास यंत्रणांना अद्याप मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यात अपयश आले असून उच्च न्यायालयानेही तपास यंत्रणेवर निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे.

Trending