आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर्तास विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे बंदी कायमच; हायकाेर्टाने राखून ठेवला निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डीजे आणि डाॅल्बी व्यावसायिकांवर पोलिसांद्वारे सुरू असलेल्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. त्यामुळे तूर्तास तरी विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीला बंदीच असेल. 


दरम्यान, डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टिम ध्वनिप्रदूषणाचा प्रमुख स्रोत असून उत्सवादरम्यान त्यांच्या वापराला परवानगी देणे योग्य नसल्याचे मत राज्य सरकारने न्यायालयात मांडले. ध्वनिप्रदूषणाबाबत दाखल झालेल्या एकूण याचिकांपैकी किमान ७५ टक्के प्रकरणे डीजे व डॉल्बीशी संबंधित असल्याचे सांगत डीजेवरील बंदी ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा एक भाग असल्याची भूमिकाही सरकारने घेतली आहे. सामान्य आवाजाच्या पातळीवर डीजे किंवा डॉल्बी सिस्टिम सुरू केली तरी ध्वनिप्रदूषणाची मर्यादा किमान शंभर डेसिबल्सपर्यंत जात असून हे प्रमाण ध्वनिप्रदूषण कायद्याने नेमून दिलेल्या मर्यादेच्या जवळपास दुप्पट असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...