आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणांचा उत्साह द्विगुणित : शेअर बाजारात तेजी, रुपया मजबूत, कच्चे तेल स्वस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली - कच्च्या तेलाच्या घसरत्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयांची मजबूत घोडदौड, विदेशी संस्था आणि गुंतवणूकदारांकडून सणांची उत्साही खरेदी यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात तेजी परतली. शेअर बाजाराने गुरुवारी जे गमावले ते शुक्रवारी कमावले. 
कमावले ते गमावले : सेन्सेक्सची ७३२ अंकांची उसळी, १९ महिन्यांतील एका दिवसातील सर्वोत्तम तेजी, ३ दिवसांत रुपया ८५ पैसे वधारला, कच्चे तेलात २ दिवसांत ३% घसरण 

 

शेअर बाजार : गोल्डन फ्रायडे 
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक ७३२.४३ अंकांनी उसळून ३४७३३.५८ वर पोहोचला. मार्च २०१७ नंतर १९ महिन्यांतील ही सेन्सेक्स एका दिवसातील सर्वोत्तम कमाई आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २३७.८५ अंकांच्या तेजीसह १०४७२.५० वर स्थिरावला. धातू, वाहन, बांधकाम, पायाभूत सुविधा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, बँक, भांडवली वस्तू आदी क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभाग खरेदीमुळे वधारले. 

 

कच्चे तेल : घसरण सुरूच 
कच्चे तेल अर्थात क्रूड ऑइलच्या किमतीत घसरण सुरूच आहे. या आठवड्याच्या प्रारंभी प्रतिपिंप ८४ डॉलर ही चार वर्षांतील उच्चांकी पातळी गाठणारे कच्चे तेल आता पिंपामागे ८०.४७ डॉलरपर्यंत खाली आले आहे. मागील दोन दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती ३ टक्क्यांनी घसरल्या आहेत. यामुळे देशातील इंधनाच्या किमती स्वस्त होण्याची आशा बळावली आहे. 

 

रुपया : ५६ पैशांची कमाई 
शेअर बाजारातील तेजी आणि निर्यातदारांकडून झालेली डॉलरची विक्री यामुळे रुपयाला बळ मिळाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाने ५६ पैशांची कमाई करत शुक्रवारी ७३.५७ ही पातळी गाठली. गुरुवारीही रुपयाने ८ पैशांची तेजी दाखवली होती. मागील तीन दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ८५ पैशांनी वाढले आहे. 

बातम्या आणखी आहेत...