आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक ८ आठवड्यांच्या नीचांकावर; बाजारात तिसऱ्या दिवशी विक्रीचा जोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी स्तरावर आल्यानंतर आणि कच्च्या तेलाच्या किमती उच्चस्तरावर पोहोचल्यानंतर देशांतर्गत बाजारात सलग तिसऱ्या दिवशी विक्रीचा जोर राहिला. 


बीएसईच्या ३० समभागांचा संवेदी सूचकांक सेन्सेक्स १६९.४५ अंक म्हणजे ०.४५ टक्के घसरून ३७,१२१.२२ अंकावर आणि राष्ट्रीय निर्देशांकाचा निफ्टी ४४.५५ अंक म्हणजे ०.३९ टक्के घसरणीत ११,२३४.३५ अंकांवर बंद झाला. हे दोन्ही प्रमुख निर्देशांक जवळपास आठ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर आहेत. 


एफएमसीजी, वित्त व रियल्टी समूहांवर जास्त दबाव पाहावयास मिळाला. दुसरीकडे, धातू समूहातील कंपन्यांमधील खरेदीने बाजारात घसरण मर्यादित राहिली. सेन्सेक्समध्ये इडसइंड बँकेचा समभाग ३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. मारुती सुझुकीचे समभाग सव्वादोन टक्के व एचडीएफसी बँकेचे दीड टक्क्यापेक्षा जास्त घसरले. विदेशी बाजारांच्या सकारात्मक संकेतामुळे सेन्सेक्स ३७,४३२.९३ अंकांवर खुला झाला व सुरुवातीस ३७,५३०.६३ अंकांच्या दिवसातील उच्चस्तरावर पोहोचला. 

बातम्या आणखी आहेत...