शेअर बाजार / सेंसेक्समध्ये मागील 10 वर्षातील सर्वात मोठी उसळी, गुंतवणुकदारांनी कमावले 6.83 लाख कोटी

अर्थ मंत्र्यांनी शेअर बाजार आणि कॉर्पोरेट टॅक्स संबंधित घोषणा करताच बाजाराला गती

दिव्य मराठी वेब

Sep 20,2019 07:01:13 PM IST


मुंबई- सरकारने कॉर्पोरेट टॅक्स कमी करणे आणि गुंतवणुक दारांशी निगडीत घोषणा करताच शेअर बाजारात मोठी गती आली. सेंसेक्स 1921.15 अंकाने वाढून 38,014.62 वर बंद झाला. इंट्रा-डेमध्ये 2,284.55 अंक वाढून 38,378.02 पर्यंत पोहचला. निफ्टीची क्लोजिंग 569.40 प्वाइंट वर 11,274 वर झाली. इंट्रा-डे 677 अंकांच्या उसळीसोबतच 11,381.90 वर पोहचला.

सेंसेक्सच्या 30 पैकी 25 आणि निफ्टीच्या 50 पैकी 44 शेअर वाढून बंद झाले. एनएसईवर 11 पैकी 10 सेक्टर इंडेक्स फायद्यात राहीले. ऑटो इंडेक्समध्ये सर्वात जास्त 9.9% वाढ झाली. हे मे 2009 नंतरची सर्वात जास्त उसळी आहे.

तारीख सेंसेक्स निफ्टी
वाढ उच्च स्तर वाढ उच्च स्तर
18 मे 2009 2110.79 14,284.21 712.65 4384.30
20 सप्टेंबर 2019 2284.55 38,378.02 677.10 11,381.90

सेंटीमेंटमध्ये सुधार होणे बाजारासाठी महत्वाचे- विश्लेषक


सेंट्रल वेल्थ मॅनेजमेंटचे हेड (इक्विटी अॅडवाइजरी) देवांग मेहता यांचे म्हणने आहे की, सरकारच्या घोषणेमुळे आर्थिक विकासाच्या गतीत वाढ झाली. यामुळे कॉरपोरेट आणि कॅपिटल मार्केटमध्ये जोशाचे वातावरण तयार होईल. सेंटीमेंटमध्ये सुधार होणे गरजेचे आहे. कारण, सेंटीमेंट बिगडल्याने मागील काही दिवसात बाजार नीचांकावर पोहचला होता.

तारीख वाढ बंद
20 सप्टेंबर 2284.55 38,014.62
20 मे 1481.79 39,352.67
23 मे 1014.76 38,811.39
26 ऑगस्ट 843.32 37,494.12

निफ्टीचे टॉप-5 गेनर :

शेअर वाढ
आयशर मोटर 13.38%
हीरोमोटोकॉर्प 12.34%
इंडसइंड बँक 10.94%
बजाज फायनांस 10.59%
मारुती 10.54%


निफ्टीचे टॉप-5 लूजर :

शेअर निचांक
जी एंटरटेनमेंट 2.87%
पॉवरग्रिड 2.68%
इन्फोसिस लिमिटेड 1.63%
टीसीएस 1.57%
एनटीपीसी 1.52%
X
COMMENT