आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Stock Market Latest Update: September 20 Share Market, Trade BSE, Nifty, Sensex Live News Updates

सेंसेक्समध्ये मागील 10 वर्षातील सर्वात मोठी उसळी, गुंतवणुकदारांनी कमावले 6.83 लाख कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सरकारने कॉर्पोरेट टॅक्स कमी करणे आणि गुंतवणुक दारांशी निगडीत घोषणा करताच शेअर बाजारात मोठी गती आली. सेंसेक्स 1921.15 अंकाने वाढून 38,014.62 वर बंद झाला. इंट्रा-डेमध्ये 2,284.55 अंक वाढून 38,378.02 पर्यंत पोहचला. निफ्टीची क्लोजिंग 569.40 प्वाइंट वर 11,274 वर झाली. इंट्रा-डे 677 अंकांच्या उसळीसोबतच 11,381.90 वर पोहचला.
सेंसेक्सच्या 30 पैकी 25 आणि निफ्टीच्या 50 पैकी 44 शेअर वाढून बंद झाले. एनएसईवर 11 पैकी 10 सेक्टर इंडेक्स फायद्यात राहीले. ऑटो इंडेक्समध्ये सर्वात जास्त 9.9% वाढ झाली. हे मे 2009 नंतरची सर्वात जास्त उसळी आहे.
 तारीख                   सेंसेक्सनिफ्टी
वाढ उच्च स्तर      वाढउच्च स्तर
18 मे 20092110.7914,284.21712.654384.30
20 सप्टेंबर 20192284.5538,378.02677.1011,381.90

सेंटीमेंटमध्ये सुधार होणे बाजारासाठी महत्वाचे- विश्लेषक

सेंट्रल वेल्थ मॅनेजमेंटचे हेड (इक्विटी अॅडवाइजरी) देवांग मेहता यांचे म्हणने आहे की, सरकारच्या घोषणेमुळे आर्थिक विकासाच्या गतीत वाढ झाली. यामुळे कॉरपोरेट आणि कॅपिटल मार्केटमध्ये जोशाचे वातावरण तयार होईल. सेंटीमेंटमध्ये सुधार होणे गरजेचे आहे. कारण, सेंटीमेंट बिगडल्याने मागील काही दिवसात बाजार नीचांकावर पोहचला होता.तारीख  वाढबंद
20 सप्टेंबर2284.5538,014.62
20 मे1481.7939,352.67
23 मे1014.7638,811.39
26 ऑगस्ट  843.3237,494.12

निफ्टीचे टॉप-5 गेनर :

शेअरवाढ
आयशर मोटर       13.38%
हीरोमोटोकॉर्प12.34%
इंडसइंड बँक10.94%
बजाज फायनांस10.59%
मारुती10.54%

 

निफ्टीचे टॉप-5 लूजर :

शेअर                        निचांक  
जी एंटरटेनमेंट2.87%
पॉवरग्रिड2.68%
इन्फोसिस लिमिटेड1.63%
टीसीएस1.57%
एनटीपीसी1.52%
बातम्या आणखी आहेत...