आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅटचे लॅच लॉक तोडून ७.५ लाखांचे हिरेजडित दागिने चोरले, सीसीटीव्ही फुटेजआधारे तपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बन्सीलालनगरमध्ये चोरांनी भरदिवसा फ्लॅटचे लॅचलॉक तोडून चार्टर्ड अकाउंटंटच्या (सीए) बेडरुममधील साडेसात लाख रुपयांचे हिरेजडीत दागिने व २२ हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. बन्सीलालनगरच्या शिल्पनगरमध्ये राहणारे सीए महेश घनश्याम अग्रवाल (रा. फ्लॅट २, अमूल्य व्हिला) यांच्या घरात हा धक्कादायक प्रकार घडला. 


अग्रवाल यांचे बन्सीलालनगरमध्येच पटवर्धन रुग्णालयाजवळ कार्यालय आहे. अग्रवाल यांच्या पत्नीही त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करतात. त्यामुळे त्या रोज सकाळी अकरा वाजता कार्यालयात जातात. महेश सकाळी कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्या पत्नी लॅचलॉक लावून कार्यालयात गेल्या. दुपारी दोन वाजता घरी परतल्यावर मात्र दरवाजाचे लॅचलॉक तोडलेले े दिसले व हा प्रकार समोर आला. वेदांतनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, राहुल सूर्यतळ, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

 
टॉमी अडकवून तोडले लॅच लॉक 
चोरट्यांनी लॅचलॉक स्क्रूसह तोडले. आत शिरून बेडरुमचा दरवाजा तोडून दोन लाकडी कपाट फोडले. त्यातील २२ हजारांची रोकड, सोन्याचा चार तोळ्यांचा सेट ज्यात प्रत्येकी १ तोळ्याच्या दोन अंगठ्या, ३७ सेटचे हिरे असलेले अडीच तोळ्याचे ब्रासलेट, ६ तोळ्यांच्या २ बांगड्या, २ तोळ्याची १ सोनसाखळी, साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, दोन कर्णफुले असा ऐवज लांबवला. 

बातम्या आणखी आहेत...