आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत लग्नातून 44 ताेळे साेने, हिऱ्याचा हार लंपास; चाेरीत अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- शिर्डीतील एका हाॅटेलमध्ये लग्नसमारंभातून ४४ तोळे सोन्याचे दागिने आणि हिऱ्याचा हार असलेली बॅग अज्ञाताने लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी दाेन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. शुक्रवारी औरंगाबादेतही अशाच पद्धतीने एका लग्नसमारंभातून ४२ ताेळे साेने व सव्वा लाखाची राेकड चाेरीस गेली हाेती. 

 

मालेगावातील पटणी व नाशकातील शहा परिवाराचा विवाह साेहळा शिर्डीतील हॉटेलमध्ये हाेता. लग्न दुपारी २ वाजता लागले. त्यानंतर नातेवाइकांनी वधू-वराला लग्नात भेट देण्यासाठी आणलेले दागिने एका पेटीत ठेवले. साेफ्यावर ठेवलेली ही बॅग चाेरट्याने लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सर्वांनी शाेधाशाेध केली, मात्र उपयाेग झाला नाही. बॅगेत २ लाख १० हजार रुपयांचे ७ तोळे वजनाचे ३ मंगळसूत्र, ६ लाखांचे २० तोळ्यांचे ५ हार, १ लाख ८० हजारांच्या ६ तोळ्याच्या ४ बांगड्या, ४५ हजारांचे १५ ग्रॅमचे ब्रासलेट, ३६ हजारांची १२ ग्रॅमची अंगठी, ३६ हजारांच्या १२ ग्रॅमच्या ३ बुट्या, ४५ हजारांचा १५ ग्रॅमचा सोन्याचा हार, १५ हजारांची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १ लाख ६० हजार रुपयांचा हिऱ्याच्या हाराचा सेट असा १४ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चाेरीस गेला. 

 

पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये २ अनाेळखी युवक बराच वेळ रेंगाळत असल्याचे दिसून आले. नातेवाईक बाेलण्यात गुंग असताना यापैकी एकाने दागिन्यांची बॅग लंपास केल्याचे फुटेजवरून दिसून आले. या चाेरीत अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा संशय आहे. 

बातम्या आणखी आहेत...