आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डस्टबिनमध्ये सापडले शाही कुटुंबियांचे 42 कोटींचे दागिने, 6 महिन्यांपूर्वीच झाली होती चोरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम - स्वीडनच्या शाही परिवाराचे मुकूट आणि तलवारींसह इतर दागिने नुकतेच एका डस्टबिनमध्ये सापडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी हे सर्व साहित्य चोरीला गेले होते. डस्टबिनमध्ये एका बॉक्समध्ये हे दागिने ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यावर बॉम्ब असे लिहिले होते. स्थानिकांनी बॉम्ब समजून वेळीच पोलिसांना फोन लावला आणि घटनास्थळी बॉम्बशोध पथकासह दाखल झालेल्या पोलिसांनी सत्य समोर आणले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही साहित्ये आणि दागिने किंग कार्ल्स-IX च्या काळातील आहेत.


'फ्यूनरल रिगेलिया'
स्वीडनच्या एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, सिक्युरिटी गार्ड्सच्या तपासात बॉक्स उघडण्यात आले तेव्हा आत शाही घराण्याच्या वस्तू सापडल्या. या शाही साहित्ये आणि दागिन्यांची किंमत शाही 60 लाख अमेरिकन डॉलर (जवळपास 42 कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे. शाही कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास मृतदेहासोबत घराण्याच्या अशा काही वस्तू दफन केल्या जातात. या साहित्यांना फ्यूनरल रिगेलिया असेही म्हटले जाते. 1625 मध्ये पहिल्यांदाच या विधाची वापर क्वीन ख्रिस्तीनाच्या अंत्यविधीला झाला होता. सध्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून हा बॉक्स नेमका कुणी ठेवला याचा शोध घेतला जात आहे.


सद्यस्थितीला 22 वर्षांच्या एका स्थानिकाला दोन मुकूट चोरल्याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. 31 जुलै रोजी स्ट्रेंगनास कॅथेड्रलमध्ये साहित्य ठेवत असलेल्या ठिकाणी काच तुटलेल्या अवस्थेत सापडला होता. यानंतर अलार्म वाजला आणि युवकाला अटक करण्यात आली. परंतु, अद्यापही त्या युवकाचे नाव आणि ओळख समोर आले नाहीत. याच प्रकरणात आणखी एका व्यक्तीला देखील ताब्यात घेण्यात आले आहेत. परंतु, त्याच्या विरोधात शाही दागिने चोरल्याचे आरोप नाहीत. फ्यूनरल रिगेलिया स्ट्रेंगनास, उप्साला आणि वास्तेरास कॅथेड्रलमध्ये ठेवण्यात आले आहेत. स्वीडनचे हे दागिने स्टॉकहोमच्या शाही किल्ल्याच्या नियंत्रणात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी ऑगस्टमध्ये ही चोरी झाली होती आणि चोरटे पाण्याच्या मार्गाने फरार झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते, की चोरटे स्पीडबोटमध्ये पसार झाले होते.

बातम्या आणखी आहेत...