आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Stone Pelting At Security Forces After Post Eid Ul Fitr Prayers, Violence In Kashmir's Srinagar City

ईद साजरी करत असलेल्या नागरिकांवर दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, श्रीनगरमध्ये नमाज पठणानंतर सुरक्षादलावर दगडफेक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुलवामा(जम्मू-कश्मीर)- पुलवामामध्ये बुधवारी सकाळी ईदच्या दिवशी दहशदवाद्यांनी एका घराक घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एका तरूणालीही गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरककडे श्रीनगरमध्ये ईदची नमाज पठण झाल्यानंतर काही लोक रस्त्यावर उतरले. त्यांच्या हातात दहशदवादी संघटना आयएस(इस्लामिक स्टेट) आणि झाकिर मुसा या दहशदवाद्यांचे पोस्टर होते. त्यांनी सुरक्षा दलावर दगडफेकही केली आहे.

 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, दहशदवादी पुलवामातील ज्या घरात घुसले होते, तिथे लोक ईज साजरी करत होते. कोणी काही करू शकेल, त्याआधीच दहशदवाद्यांनी गोळ्या झाडून तेथून पळ काढला. मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव नगीना जां आहे. सुरक्षा दलाने हल्ला करणाऱ्या दहशदवाद्यांचा शोध सुरू केला आहे. नगीना यांचे पती युसूफ लोन यांचीही दोन वर्षांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारून हत्या केली होती.


ईदच्या नमाज पठणानंतर श्रीनगरमध्ये आयएसचे झेंडे दाखवले
श्रीनगरमध्ये एका मस्जिदमध्ये नमाज पठणानंतर काही लोकांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. यात दगडफेक करणाऱ्यांनी पाकिस्तान आणि दहशदवादी संघटना इस्लामिक स्टेट(आयएस)चे झेंडे दाखवले. प्रदर्शन करणाऱ्यांमध्ये बहुतेक तरूण होते आणि त्यांनी दहशदवादी हाफिज सईद, मसूद अजहर आणि झाकिर मूसाचे पोस्टर दाखवत होते.

बातम्या आणखी आहेत...