आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांबापुरात बैल बिथरल्यावरून दाेन गटांत दगडफेक; ९ जखमी, २० जण ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तांबापुरातील मच्छी बाजार, गवळीवाड्यात रविवारी दुपारी झालेल्या किरकोळ भांडणावरून रात्री ९.४५ वाजता दोन गटात तुफान हाणामारी झाली. या वेळी गोठ्याजवळील बैल बिथरल्याने हाणामारीचे रूपांतर जोरदार दगडफेकीत झाले. यात दोन्ही गटांकडून दगड, विटा, काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेत १० दुचाकींचे नुकसान तर १० घरांची नासधूस झाली. तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या ६ कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत तर २ तरुण व एक बालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रात्री १२ वाजता मलिकनगरात दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला हाेता. दगडफेक करणाऱ्या दोघांची पाेलिसांनी चाैकशी केली. तसेच रात्री १ वाजता २० तरुणांना ताब्यात घेतले. 

तांबापुरा परिसरातील मच्छी बाजार, गवळीवाडा, बिस्मिल्ला चौक, मशीद परिसर, बिलाल चौक, हटकर चौकात रविवारी रात्री ९.४५ वाजता दोन गटात जोरदार हाणामारी होऊन दगडफेक झाली. या दगडफेकीत दोन्ही गटांकडून लाठ्या, काठ्या, दगड, विटांसह काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात पळापळ होऊन तणाव निर्माण झाला होता. या वेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अतुल वंजारी, मनोज सुरवाडे, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, किशोर पाटील, अतुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तणाव वाढत असल्याने व दगडफेकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. दगडफेकीत आकाश नरेश भोई, अजय राजू गरुड (वय १९, रा. तांबापुरा) व सचिन हटकर (वय ८) हे तिघे तर एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे कर्मचारी हेमंत पाटील, किशाेर पाटील, सचिन चाैधरी व इतर ३ असे ६ पाेलिस गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी उपचारार्थ तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात अाले. 

दगडफेक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. तसेच मध्यरात्री १ वाजेनंतर शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक, क्यूआरटी, एआरटी पथकाने दंगलग्रस्त भागात हिस्ट्रिशीटर गुन्हेगारांची तपासणी केली. यात संशयित असलेल्या १५ ते २० तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. 

महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रात्री १२ वाजता मलिकनगरात दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला हाेता. दगडफेक करणाऱ्या दोघांची पाेलिसांनी चाैकशी केली. तसेच रात्री १ वाजता २० तरुणांना ताब्यात घेतले. 

तांबापुरा परिसरातील मच्छी बाजार, गवळीवाडा, बिस्मिल्ला चौक, मशीद परिसर, बिलाल चौक, हटकर चौकात रविवारी रात्री ९.४५ वाजता दोन गटात जोरदार हाणामारी होऊन दगडफेक झाली. या दगडफेकीत दोन्ही गटांकडून लाठ्या, काठ्या, दगड, विटांसह काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात पळापळ होऊन तणाव निर्माण झाला होता. या वेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अतुल वंजारी, मनोज सुरवाडे, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, किशोर पाटील, अतुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तणाव वाढत असल्याने व दगडफेकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. दगडफेकीत आकाश नरेश भोई, अजय राजू गरुड (वय १९, रा. तांबापुरा) व सचिन हटकर (वय ८) हे तिघे तर एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे कर्मचारी हेमंत पाटील, किशाेर पाटील, सचिन चाैधरी व इतर ३ असे ६ पाेलिस गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी उपचारार्थ तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात अाले. 

दगडफेक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. तसेच मध्यरात्री १ वाजेनंतर शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक, क्यूआरटी, एआरटी पथकाने दंगलग्रस्त भागात हिस्ट्रिशीटर गुन्हेगारांची तपासणी केली. यात संशयित असलेल्या १५ ते २० तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. 

वीटांचा खच उचलला 
दगडफेकीत सुमारे १० वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाने दगड, विटा, काचेच्या बाटल्या फेकल्याने रस्त्यावर खच पडलेला हाेता. ताे रात्री ११.३० वाजता मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने उचलून नेला. 

रात्री धरपकड सुरू 
घटनेची माहिती कळाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक लोहीत माताणी, डीवायएसपी सचिन सांगळे, एलसीबीचचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध अाढाव, बी. जी. रोहम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड सुरू होती. 

बातम्या आणखी आहेत...