Home | National | Other State | Stone tour in Himachal; Half an hour in two groups of two villages, stone-throwing,

हिमाचलमध्ये दगडांची यात्रा; दोन गावांतील दोन गटांत अर्धा तास दगडफेक, मार लागणे शुभशकुन

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Nov 11, 2018, 10:43 AM IST

अर्धा तास चाललेल्या दगडफेकीत जमोगी गावातील सुरेश यास डोक्याला दगड लागला आणि त्याच्या रक्ताने भद्रकाली मातेला अभिषेक

 • Stone tour in Himachal; Half an hour in two groups of two villages, stone-throwing,

  सिमला - हिमाचलमधील सिमल्यापासून ३० किमी दूर असलेल्या धामी गावात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दगडांची यात्रा भरते. दगडांचा असा खेळ येथे होतो की, जोपर्यंत रक्त सांडत नाही, ताेपर्यंत दगडफेक थांबत नाही. गुरुवारच्या यात्रेत हजारो लोक जमले होते. धामी राज्याचे राजा जगदीपसिंग यांचे आगमन होताच दोन गटांत दगडफेक सुरू होते.

  अर्धा तास चाललेल्या दगडफेकीत जमोगी गावातील सुरेश यास डोक्याला दगड लागला आणि त्याच्या रक्ताने भद्रकाली मातेला अभिषेक करण्यात आला. यात्रेत जखमा होेणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते. धामी गावातील यात्रा खूप प्रसिद्ध आहे.

  नरबळीनंतर पशुबळी, आता दगडफेक

  पूर्वी येथे दरवर्षी नरबळी देण्याची प्रथा होती. राजाच्या मृत्यूूनंतर राणी सती गेली. मृत्यूच्या शेवटच्या घटकेला तिने नरबळीची प्रथा बंद केली. त्यानंतर पशुबळी देण्यात येऊ लागला. नंतर तीही प्रथा बंद झाली. आता दगडांची यात्रा भरते.

  दगडफेकीसाठी दोन टोळ्यांनाच मान्यता

  एका बाजूला राजघराण्यातील टोळी व दुसरीकडे जमोगी घराण्याच्या टोळीचे सदस्य दगडफेकीत भाग घेतात. बाकी लाेक फक्त यात्रेसाठी येतात. यात्रेची सुरुवात राजघराण्यातील नृसिंहाच्या पूजेनंतर करण्यात येते.

Trending