आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक, राजकीय सुधारणांसाठी इराकमध्ये सलग नवव्या दिवशी रास्ता रोको

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराक : आर्थिक आणि एकूणच राजकीय सुधारणांसाठी इराकमध्ये सलग नवव्या दिवशी हजारो नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन, निदर्शने केली. त्यांनी इराकचे मुख्य बंदर असलेल्या उम्म कस्र या बंदराचा मार्ग रोखून धरला. हे बंदर बसरा या शहराच्या दक्षिणेला आहे. निदर्शकांनी शनिवारी टायर जाळून तसेच काँक्रीटचे ब्लाॅक टाकून हा मार्ग रोखला. अल-जझिराच्या नताशा घोनेइम यांनी इराकची राजधानी बगदाद येथून दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दले आणि निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकीत १०० जण जखमी झाले, तर राॅयटर या वृत्तसंस्थेने आरोग्य आणि सुरक्षा सूत्रांचा हवाला देऊन जखमींची संख्या ३० असल्याचे म्हटले आहे.