आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर - नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांनी केलेल्या फसवणुकीचा दंड पूर्ण जडजवाहिरात क्षेत्राला भोगावा लागत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देणे पूर्णपणे बंद केले आहे.
यामुळे वार्षिक चार लाख कोटी रुपये टर्नओव्हर असलेले हे क्षेत्र नगदीच्या संकटात अडकले आहे. सुवर्णकारांना नवीन कर्ज मिळणे तर बंदच झाले आहे. दुसरीकडे बँकांनी जुनी कॅश क्रेडिट (सीसी) मर्यादाही कमी केली आहे. सीसी लिमिटअंतर्गत व्यापाऱ्यांना दर तिमाहीच्या अखेरीस एकदा कर्ज फेडावे लागते. त्यानंतर पुन्हा एकदा नवे कर्ज जारी होते.
जयपूर सराफा ट्रेडर्स समितीचे अध्यक्ष कैलाश मित्तल यांनी सांगितले की, छोट्या सुवर्णकारांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कर्ज देणे पूर्णपणे बंद केले आहे. दिवाळीचा हंगाम मंद गेल्याने सुवर्णकारांकडे साठा असला तरी नगदी अत्यंत कमी आहे. सीसी मर्यादा कमी केल्याने आणि नवीन कर्ज मिळत नसल्याने व्यवहारासाठी लागणाऱ्या (वर्किंग) नगदीची अडचण येत आहे. या सर्व अडचणींमुळे बँकांकडून घेतलेल्या जुन्या कर्जाचे हप्ते फेडतानाही अडचणी येत आहेत.
निर्यातकांवर परिणाम
देशात सुमारे ६,५०० निर्यातक जडजवाहिराताशी संबंधित आहेत. त्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. आम्हाला कर्ज मिळत नसल्याने चीन आणि थायलंडसारख्या देशांच्या निर्यातकांना फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन वर्षांत चार झटके
सुवर्णकारांच्या माहितीनुसार ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या नोटबंदीमुळे या क्षेत्राला अडचणी सहन कराव्या लागल्या. सरकारने नगदीमध्ये सोने खरेदीची मर्यादा दोन लाख केली, त्याचाही परिणाम झाला. त्यानंतर जीएसटीमुळे दागिने महाग झाले. शिल्लक कसर नीरव मोदी घोटाळ्याने पूर्ण केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.