आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धाेनीच्या भविष्याबाबत अंदाज बांधणे बंद करून आयपीएलची वाट पाहा : शास्त्री

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या आगामी भविष्यातील करिअरबाबतची अंदाजपंची करणे टाळणेच चाहत्यांच्या हितावह आहे. आता याच चाहत्यांनी हा माेह टाळून आगामी सत्रातील आयपीएलच्या सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी वाट पाहावी, असा माैलिक सल्ला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला. आयपीएल फाॅरमॅटच्या आधारावरच आता पुढची टीम निश्चित केली जाणार आहे. काेच शास्त्री यांनी टीम सध्याची कामगिरी, वर्ल्डकप सेमीफायनलचा पराभव व टी-२० वर्ल्डकपबाबत चर्चा केली.

वर्ल्डकपच्या पराभवावर : मँचेस्टरमध्ये त्या दिवसाच्या १५ मिनिटांच्या सुमार खेळीने वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळेच पुढची वाट आमच्यासाठी अधिकच खडतर हाेती. हा पराभव पचवणे सर्वांसाठीच कठीण हाेते. मात्र, टीममधील अव्वल कामगिरीची चमक मी लक्षात घेतली आणि कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी सुरुवात केली.

धोनीवर...आयपीएलसाठी पुनरागमनाची आशा
भविष्यातील निर्णय धाेनीला स्वत:च घ्यावा लागेल. केव्हा कमबॅक करायचे व आयपीएलमध्ये कशी खेळी करायची, हे ताेच ठरवणार आहे. त्याच्या जागीही आता नवीन युवा खेळाडू यष्टिरक्षकासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आता धाेनीच्या बाबतीत आता तरी अंदाज बांधणे चुकीचे ठरेल. यासाठी आपण आयपीएलची वाट पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल. ही लीग महत्त्वाची आहे. कारण, येथूनच १५ सदस्यीय संघ निश्चित हाेईल.

अध्यक्ष गांगुलीवर
बीसीसीआय सध्या अडचणीत सापडलेली आहे. त्यामुळे अशात काम करणे नवनियुक्त अध्यक्ष साैरव गांगुलीला कठीण आहे.मी याच चाहत्यांमधील आहे, ज्यांनी गांगुलीला नियुक्तीपूर्वीच शुभेच्छा दिल्या हाेत्या. गांगुली हा उत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच त्याच्यात कुशल नेतृत्वाचे गुणही आहेत.

गुलाबी चेंडूबाबत
आता चेंडूवर काम करण्यासाठी वेळ लागणार आहे. गुलाबी चेंडूवरच्या सामन्याने आता चाहत्यांमध्येही गाेडी निर्माण केली. त्यामुळे आता यावर सखाेल पद्धतीने काम करण्याची गरज आहे. यातून या चेंडूवरच्या सामन्यांना माेठी पसंती मिळेल. यासाठी आमचाही प्रयत्न आहे.