आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत वंचित बहुजन आघाडीने केला रास्ता रोको

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांना आरे प्रकरणात अटक केल्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी(दि.सहा) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे परभणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मोहम्मद गौस(झैन), भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण कनकुटे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.धर्मराज चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंबेडकर पुतळा जवळ जोरदार घोषणाबाजी करीत बाळासाहेब आंबेडकरांच्या अटकेचा निषेध नोंदवला.
 

बातम्या आणखी आहेत...