आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर अफवा, भडक मेसेज थांबवा : केंद्र सरकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोशल मीडियावर अफवा व भावना भडकावणारे मेसेज थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे निर्देश केंद्र सरकारने संबंधित कंपन्यांना दिले आहेत. काही समाजविघातक शक्ती या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग करत असल्याच्या तक्रारी अाहेत. त्याचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असेही निर्देश दिले.


केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले, सोशल मीडियाने आपल्या व्यासपीठावर अफवा, अशांती पसरवणे, महिला आणि मुलांविरुद्ध गुन्हेगारी तसेच राष्ट्रहिताविरुद्धच्या कारवाया थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारावी. केंद्रीय गृह सचिव राजीव गोबा यांनी गुरुवारी फेसबुक, गुगल, ट्विटर, व्हाॅट्सअॅप, यू-ट्यूब आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन हे निर्देश दिले. यात माहिती-तंत्रज्ञान विभागातील वरिष्ठ अधिकारीही सहभागी होते. यापूर्वी जूनमध्येही अशीच बैठक घेण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...