आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम हाैदात श्री विसर्जनापासून भाविकांना राेखले; अंनिसचा अाराेप, सनातनकडून खंडन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी व जलप्रदूषण राेखण्यासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हाैदातच करावे, असे अावाहन अंनिस व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने राज्यभर करण्यात येत अाहे. मात्र पुण्यात बुधवारी सात दिवसांच्या श्रींचे विसर्जन हाेत असताना 'गणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करून धर्मपालन करा,' असे अावाहन हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्थेच्या वतीने केले जात हाेते. काही भाविकांना त्यांनी कृत्रिम हाैदाकडे जाण्यापासून राेखल्याचा अाराेपही करण्यात अाला, मात्र सनातनने त्याचे खंंडन केले अाहे. 


अंनिसचे मिलिंद देशमुख यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी खरे तर प्रत्येक महापालिकेने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. मात्र काही लोक धर्मशास्त्राचा आधार घेऊन सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत अाहेत. बुधवारी पुणे शहरातील काही भागात कृत्रिम हौदात विसर्जन करण्यासाठी अालेल्या भाविकांना अटकाव करण्यात अाला. यासंदर्भात अंनिसने पाेलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पत्रे लिहिली आहेत. भाविकांवर बळजबरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात अाली असल्याचे देशमुख म्हणाले. 


वाहत्या पाण्यात विसर्जन शास्त्रानुसार : गाेखले 
अाराेपांचे खंडन करताना सनातन संस्थेचे प्रवक्ते पराग गोखले म्हणाले, 'पहिल्यापासून आमची, धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात विसर्जन करावे, अशी भूमिका अाहे. सनातनचे कार्यकर्ते पुण्यात नदीघाटावर भित्तिपत्रके घेऊन प्रचार करतात. मात्र, कोणत्याही प्रकारची बळजबरी कोणावर केली जात नाही. अंनिसची भूमिका दुटप्पी अाहे. वर्षभर केमिकल कंपन्या नदीपात्रात पाणी सोडतात व अनेक शहरांत सांडपाणी विनाप्रक्रिया साेडले जाते, तेव्हा अंनिस शांत असते. मात्र हिंदू उत्सव आले की त्यांचे पर्यावरणप्रेम उफाळून येते. प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींना आमचा विरोधच असून शाडू मातीचे आणि नैसर्गिक रंग असलेले गणपती बसवावेत, असे अावाहन अाम्ही करत असताे,' असेही गाेखले यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...