आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणापासूनच संवेदनशील होते राजीव गांधी, वाचा इंदिराजींनी सांगितलेल्या काही आठवणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती 20 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. भारताच्या विकासामध्ये राजीव गांधी यांचा मोलाचा वाटा आहे असे नेहमीच म्हटले जाते. प्रामुख्याने देशात झालेली संगणकीय क्रांती ही राजीव गांधी यांच्यामुळेच घडली असे श्रेयही त्यांना दिले जाते. राजीव गांधी हे अत्यंत हुशार आणि राजकीय दृष्ट्या दूरदृष्टी असलेले नेते होते. हे झाले त्यांच्यामध्ये असलेले राजकीय गुण. पण राजीव गांधी यांचा स्वभाव कसा होता किंवा त्यांना काय आवडत होते, त्यांचे बालपणीचे काही किस्से फारसे आपण ऐकलेले नाही. असेच काही किस्से आपण जाणून घेणार आहोत. इंदिरा गांधी यांनी स्वतः त्यांच्या एका मुलाखतीत या सर्वाबाबत चर्चा केली आहे.


दिखावूपणा आवडत नव्हता
इंदिरा गांधींच्या मते राजीवजींना दिखावूपणा आवडत नव्हता. यासंदर्भातील लहानपणीचा एक किस्सा त्यांनी सांगितला आहे. राजीव यांचे लहान भाऊ संजय यांचे लहानपणी टॉन्सिलचे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी ऑपरेशन होईपर्यंत राजीव ऑपरेशन थिएटरबाहेर बसून होते. नंतर ते आतमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी संजय गांधी यांची बराच वेळ सेवाही केली. पण तेव्हा संजय गांधी बेशुद्ध होते. जेव्हा संजय यांना शुद्ध आली तेव्हा मात्र राजीव लगेच त्याठिकाणाहून निघून गेले. त्यामुळे त्यांना कोणताही दिखावूपणा आवडत नव्हता असे इंदिरा गांधींनी सांगितले.

 

रिकाम्या बाटल्या मागवल्या 
इंदिरा गांधी नेहमी कामानिमित्त बाहेर असायच्या. अशाच एकदा इंदिरा गांधी कामानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या. त्यावेळी राजीव आणि संजय गांधी पहेलगामला होते. इंदिराजींनी त्यांना घरी येताना काय घेऊन येऊ असे फोनवर विचारले. त्यावर राजीवजींनी इंदिरा यांना शक्य तेवढ्या रिकाम्या बाटल्या घेऊन या असे सांगितले. इंदिराजींना काही कळले नाही. त्यांनी रिकाम्या बाटल्या कशाला हव्या असे विचारले. त्यावर राजीवजींनी उत्तर दिले की, याठिकाणी एक दवाखाना आहे. त्याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना बाटलीतून औषध दिले जाते. पण बाटल्या पुरेशा नसतात. त्यामुळे त्यांना तुमची बाटली आणा मग औषध देऊ सांगितले जाते. त्यांना बाटल्या देता याव्या यासाठी त्यांनी रिकाम्या बाटल्या मागवल्या होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना गरीबांविशयी आस्था होती, असे इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. 

 

खायला काय आवडायचे 
राजीव गांधी मुळात फार कमी खायचे असे इंदिराजी सांगत असायच्या. त्यांच्या खाण्याच्या आवडीविषयी इंदिराजींनी सांगितले होते की, त्यांना त्यांचे आजोबा म्हणजे पंडित नेहरूंप्रमाणे गोड खायला फार आवडायचे. पण वजन वाढण्याची चिंता त्यांना कायम असायची. त्यामुळे ते स्वतःवर नियंत्रण ठेवायचे. त्याशिवाय रोज सकाळी दलिया खाणे हे ठरलेले होते. त्यामुळे त्यांना दलिया खायलाही आवडत होते. 

 

बातम्या आणखी आहेत...