आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवार, 16 ऑगस्ट रोजी निधन झाले. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. 3 वेळ पंतप्रधानपद भूषवणारे अटल बिहारी यांनी 2004 मध्ये लखनऊमधून निवडणूक लढताना जे अॅफिडेव्हिट दिले होते, त्यानुसार त्यांच्याकडे अॅम्बेसेडर कार होती. अॅफिडेव्हिटमध्ये त्यांनी कारच्या किमतीचा उल्लेख केला नाही आणि कधीही तिची किंमत सांगितली नाही. तसेच, जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा अॅम्बेसेडर कार वापरायचे. एवढेच नाही, ती कार वापरणारे ते देशाचे शेवटचे पंतप्रधान होते.
70 वर्षे जुनी अॅम्बेसेडर कार
जवळजवळ 70 वर्षांपूर्वी 1958 मध्ये अॅम्बेसेडर कार भारतात लॉन्च करण्यात आली होती. ही कार पाहता-पाहताच देशभरात प्रसिद्ध झाली. देशाच्या पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्य नागरिकही या कारने प्रवास करायचे. अनेक वर्षांपासून देशाचा गौरव ठरलेल्या या कारचे हिंदुस्तान मोटर्सने 2014 मध्ये प्रॉडक्शन बंद केले.
अशी होती अॅम्बेसेडर कार
कोलकात्यात बनणाऱ्या अॅम्बेसेडर कारची Encore मॉडलची एक्स-शोरूम किंमत तब्बल 4.8 लाख रुपये होती. या 5 सीटर कारमध्ये 1817cc ला MPFI 4-सिलिंडर OHC पेट्रोल इंजिन होते. यात मॅन्युअल 5 गिअर होते. दुसरीकडे, 10kmpl याचे माइलेज होते. यात 54 लिटरचे फ्यूएल टँक होते. या कारला क्रिस्टल व्हाइट, लुनर सिल्व्हर, इक्रू बेज, फायर ब्रिक रेड, ऑयस्टर ब्लू आणि जेट ब्लॅक कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले होते. अॅम्बेसेडर पेट्रोलसोबतच डिझेल आणि CNG व्हेरिएंटमध्येही लॉन्च करण्यात आली होती.
एका अपघातानंतर बदलली होती अॅम्बेसेडर कार
अटल बिहारी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा ते बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक समितीच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी भाजप हेडक्वार्टरला पोहोचले. तेथे या कारची फ्रंट डोअर जाम झाली. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ने काही मिनिटांपर्यंत ती उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु डोअर ओपन झाली नाही. नंतर वाजपेयींना दुसऱ्या अॅम्बेसेडर कारमध्ये जावे लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.