आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीवर आजही येथे आहे बजरंगबलीचा निवास, येथेच भीमाचे केले होते गर्वहरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म शास्त्रानुसार 8 लोकांना चिरंजीवी म्हणजे अमर होण्याचे वरदान आहे. यामध्ये भगवान हनुमान हे आहेत. प्रभू श्रीराम आणि देवी सीतेचे वरदान मिळाल्यामुळे हनुमान अमर आहेत. मान्यतेनुसार कैलाश पर्वतावर उत्तर दिशेला आणखी एक खास ठिकाण आहे, जेथे हनुमान आजही निवास करतात.


येथेच भीमाचे केले होते गर्वहरण
पुराणांनुसार, कलियुगात हनुमान गंधमादन पर्वतावर निवास करतात. एका कथेनुसार, पांडव अज्ञातवास कामध्ये हिमवंत पर्वत पार करून गंधमादन पर्वतावर पोहोचले होते. त्यावेळी भीम सहस्त्रदल कमळ घेण्यासाठी गंधमादन पर्वतावर गेले आणि त्याठिकाणी हनुमानाने वृद्ध वानराचे रूप घेऊन भीमाचे गर्वहरण केले होते.


गंधमादन पर्वत क्षेत्र आणि वन :
शास्त्रानुसार, गंधमादन पर्वत कैलाश पर्वताच्या उत्तर दिशेला स्थित आहे. या पर्वतावर महर्षी कश्यप यांनी तपश्चर्या केली होती. या पर्वतावर गंधर्व, किन्नर, अप्सरा, सिद्ध ऋषीमुनींचा निवास आहे. या पर्वताच्या टोकावर कोणतेही वाहन घेऊन पोहोचणे अशक्य आहे.


वर्तमानात कुठे आहे गंधमादन पर्वत?
गंधमादन पर्वत कैलाश पर्वताच्या उत्तर दिशेला असून हा पर्वत कुबेराच्या राज्यक्षेत्रामध्ये होता. सुमेरू पर्वताच्या चारही दिशांमध्ये गजदंत पर्वतापैकी एका पर्वताला त्या काळामध्ये गंधमादन पर्वत म्हटले जात होते. आज हे क्षेत्र तिबेट भागात आहेत. याच नावाचा आणखी एक पर्वत रामेश्वरमजवळ स्थित आहे, येथूनच हनुमानाने समुद्र पार करण्यासाठी उडी मारली होती.


गंधमादन पर्वतावरील मंदिर
गंधमादन पर्वतावर एक मंदिर असून यामध्ये हनुमानासोबतच श्रीराम आणि देवी सीतेची मूर्ती आहेत. मान्यतेनुसार, याच पर्वतावर श्रीराम यांनी वानर सैन्यासोबाबत बसून युद्धाची योजना आखली होती. याठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या पायाचे ठसे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...