Gossip:माजी पंतप्रधानांशी इम्रान यांचे अफेयर असल्याच्या होत्या चर्चा, इंग्लंडमध्ये झाली होती भेट
अमेरिकेत पाकिस्तानच्या माजी राजदूत शेरी रहमान यांच्याकडे त्याच्या आयोजनाची जबाबदारी असायची.
-
इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या निवडणुकीत विजय मिळवत पाकिस्तान तहरीक ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान पाकचे पंतप्रधान बनले आहेत. एकेकाळी इम्रान यांचे नाव जगातील सर्वात प्रसिद्ध महिला राजकीय नेत्यांपैकी एक आणि पाकिस्तानच्या दिवंगत नेत्या बेनझीर भुत्तो यांच्याशी देखील जोडण्यात आले होते. पाकच्या राजकीय घराण्यात जन्मलेल्या भुत्तो माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांच्या कन्या होत्या. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्या देखील पाकच्या पंतप्रधान बनल्या. त्या पाकिस्तानच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेल्या एकमेव महिला आहेत. 1988 ते 1990 आणि 1993 ते 1996 अशा दोन वेळा त्या पीएम होत्या. त्यांनी लंडनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्या जितक्या लोकप्रीय होत्या, त्यांची खासगी लाइफ तितकीच वादग्रस्त होती. त्यांच्या सेक्स पार्टी, लव्ह रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चा आजही आहेत.
अशी झाली प्रेमाची सुरुवात आणि अंत...
1975 मध्ये बेनझीर भुत्तो 21 वर्षांच्या असताना ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकत होत्या. त्याचवेळी इमरान खान आणि बेनझीर एकमेकांच्या जवळ आले. त्याचवेळी बेनझीर यांनी इमरान यांना फोन करून त्यांना लाहोरचा वाघ असे म्हटले होते. या दोघांचे अफेअर जास्त दिवस टिकू शकले नाही. त्यावेळी इमरान आणि बेनझीर यांना एकत्रितरीत्या अनेक सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आले होते. क्रिस्टोफर सँडफोर्ड यांच्या पुस्तकात, बेनझीर आणि इमरान यांच्यात शारीरिक संबंध होते असा दावा देखील करण्यात आला आहे. मात्र, इमरान यांचे संबंध केवळ बेनझीर नव्हे, तर इतर महिलांसोबतही असल्याचा पत्ता बेनझीर यांना कथितरीत्या लागला होता. त्यावरून बेनझीर संतापल्या आणि हळू-हळू दोघांमध्ये दुरावा वाढत गेला.
बंगल्यात व्हायच्या सेक्स पार्ट्या...
लंडनमध्ये राहणारे लेखक रॉशन मिर्झा यांच्या 'Indecent Correspondence: Secret Sex Life of Benazir Bhutto' या पुस्तकात बेनझीर भुत्तो यांच्याबद्दल काही दावे करण्यात आले आहेत. त्यानुसार, बेनझीर आणि एका मोरॉक्कन तरुणात सेक्स रिलेशन होते. एवढेच नव्हे, तर या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे बेनझीर भुत्तो आणि अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत राहिलेले शेरी रहमान यांच्याकडून सेक्स पार्ट्या आयोजित करत होते.
मोरॉक्कन तरुणाशी होते संबंध
रॉशन मिर्झा यांनी लिहिल्याप्रमाणे, बेनझीर आणि मोरॉक्कन तरुण उमर यांच्यात सेक्शुअल रिलेशनशिप होते. त्यावेळी बेनझीर यांच्या वयाच्या उमर निम्म्या वयाचा होता. रॉशनने हा दावा उमर आणि एक मैत्रिण साराच्या खुलाश्यांवरून केला आहे. त्या दोघांशी संवाद साधताना बेनझीर यांच्या सीक्रेट लाइफबद्दलचे आणखी काही खुलासे झाले.
सेक्स पार्ट्या, स्वॅपिंगचा स्पॉट होता रॉकवुड बंगला
पाकिस्तानी माध्यमाशी संवाद साधताना मिर्झा यांनी रॉकवुड व्हिलाचा उल्लेख केला होता. 1995 ते 2004 दरम्यान बेनझीर भुत्तोंच्या लंडनच्या या बंगल्यात सेक्स पार्ट्या व्हायच्या. भुट्टो परिवाराने 2004 नंतर हा आलीशान बंगला 40 लाख ब्रिटिश पाउंडमध्ये विकला होता. पुस्तकातील दाव्यानुसार, बेनझीर यांचे एक नव्हे, तर अनेक पुरुषांसोबत सेक्स रिलेशन होते. मिर्जा केलेल्या दाव्यानुसार, बेनझीर दुबई आणि इंग्लंडमध्ये निवांतपणे सेक्स पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायच्या. अमेरिकेत पाकिस्तानच्या माजी राजदूत शेरी रहमान यांच्याकडे त्याच्या आयोजनाची जबाबदारी असायची. एवढेच नव्हे, तर या पार्ट्यांमध्ये गर्लफ्रेंड आणि पत्न्या बदलण्याचे प्रकार सुद्धा सुरू होते.