आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडाक्याच्या थंडीत लपण्यासाठी जागा शोधत होता बेघर व्यक्ती, त्याचवेळी हाती आले असे काही की जीवनच बदलून गेले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनेक्टिकट - अमेरिकेच्या कनेक्टिकटमध्ये एका कागदाच्या तुकड्यामुळे बेघर व्यक्तीचे अवघे जीवनच बदलून गेले. हा व्यक्ती हाडे गोठवणाऱ्या थंडीत सहारा शोधत होता. फिरता-फिरता त्याला रस्त्यावर एक कागद सापडला. त्याला वाटले हे कशाचे तरी बिल असेल. पण तो उघडताच त्या व्यक्तीचे डोळे अधिकच विस्फारले. 


अॅल्मर अल्वारिज नावाच्या या व्यक्तीला एक सही केलेला चेक सापडला होता त्यात 10 हजार डॉलर म्हणजे जवळपास 7 लाख रुपयांचे अमाउंट लिहिलेले होते. विशेष बाब म्हणजे, तो चेक कोणाच्याही नावावर नव्हता. त्यामुळे त्याला वाटले असते तर लगेचच त्याने त्यावर स्वतःचे नाव लिहिले असते. पण त्याला हे योग्य वाटले नाही. 


एल्मरने चेकच्या मागे एक मोबाईल नंबर पाहिला आणि त्या चेकच्या मालकाला तो परत करण्याचा निर्णय घेतला. एल्मरने जवळच असलेल्या एका व्यक्तीला फोन करण्यास सांगितले. त्याला स्पॅनिश भाषा येत असल्याने त्याने त्याच व्यक्तीला फोनवर हे सर्व सांगण्यास सांगितले. 


फोनची बेल बाजली आणि समोरून एका महिलेचा आवाज आला. महिलेला तिचा चेक सापडल्याचे सांगताच ती बॅगमध्ये शोधू लागली. तिला बॅगमध्ये चेक मिळाला नाही तर ती सांगितलेल्या जागेवर अॅल्मरला भेटायला पोहोचली. 


तिला आश्चर्य वाटले होते की, एवढ्या मोठ्या रकमेचा चेक एखादा व्यक्ती परत करत आहे. कारण त्याला त्या चेकचा गैरवापर करता आला असता. ही महिला प्रसिद्ध रियल इस्टेट बिझनेसवुमन रॉबर्टा हॉस्की होती. रॉबर्टा तिने स्वतः सुरू केलेल्या कंपनीची सीईओ होती. 
 

बातम्या आणखी आहेत...