Home | Khabrein Jara Hat Ke | Story behind the most famous Haunted House Of Spain

या हाँटेड हाऊसमधून आजही ऐकू येतात तरुणीच्या किंकाळ्या, हे आहे येथे घडणाऱ्या विचित्र घटनांमागचे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 04:22 PM IST

याठिकाणी होणाऱ्या असामान्य हालचालींमुळे ही स्पेनमधील सर्वात भयावह इमारत म्हणून ओळखली जाऊ लागली.

 • Story behind the most famous Haunted House Of Spain

  स्पेनचे कासा एनकांटडा हे घरा सर्वात भयावह समजले जाते. या हाँटेड हाऊसच्या मागची खरी कथादेखिल अंगावर शहारा आणणारी अशी अत्यंत भयावह आहे. या हाँटेड हाऊसला कोर्टिजो जुराडो नावानेही ओळखले जाते. हे स्पेनच्या एंडलुसियाच्या सर्वात धनाढ्य कुटुंबांपैकी अक असलेल्या मैलागाच्या कुटुंबाने खरेदी केलेले आणि तयार केलेले होते. याठिकाणी भव्य कृषी केंद्र तयार करण्याचा विचार होता.


  1850 च्या सुमारास अनेक लोकांनी कासा एनकांटडाच्या आजुबाजुला प्रेत आत्मा, किंवा भुते दिसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. अनेक लोकांना विचित्र अनुभव येऊ लागले. बंद खोल्यांमध्ये उजेड दिसू लागला लगेच अचानक अंधारही व्हायचा. वस्तू आपोआप हालायच्या, जोराच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या.


  लोकांचे म्हणणे आहे की, घराच्या आत गंभीर गुन्हे आणि लोकांना छळण्यात आलेले असावे. कारण हे भयावह घर फार वर्षे जुने होते. 1925 मध्ये जुराडो कुटुंबाने हे घर खरेदी केले. त्यानंतर याठिकाणी होणाऱ्या असामान्य हालचालींमुळे ही स्पेनमधील सर्वात भयावह इमारत म्हणून ओळखली जाऊ लागली.


  पण या घराची कथा हेरेडिया कुटुंबाच्या काळाशी संबंधित असल्याचेही सांगितले जाते. हे कुटुंब श्रीमंतांच्या मदतीने 18 ते 21 वयोगटातील मुलींचे अपहरण करायचे. त्यानंतर या पीडितांबरोबर दुष्कर्म करून त्यांना हवेलीमध्ये दफन केले जात होते. त्या काळात अनेक मुली बेपत्ता झाल्या होत्या. पण यामागे कोण आहे हे कोणालाही सिद्ध करता आले नाही. पण रोज रात्री हा हाँटेड हाऊस मध्ये ज्या किंकाळ्या ऐकू येतात, त्या या मुलींच्याच असल्याचे म्हटले जाते.

 • Story behind the most famous Haunted House Of Spain
 • Story behind the most famous Haunted House Of Spain
 • Story behind the most famous Haunted House Of Spain

Trending