Home | National | Other State | story fear of ghost baba physical touch to women in Kurukshetra Haryana

पतीसमोर पत्नीला मारत होता बाबा, महिलेचे ओरडणे ऐकून वाचवण्यासाठी आला, पण बाबाच्या चेल्यांनी त्याला अडवले, म्हणाले- बाबा याच पद्धतीने उपचार करतात...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 10:34 AM IST

बाबाची महिलेवर वाईट दृष्टी, त्यामुळे म्हणाला होता, महिलेला भूतबाधा झाली आहे

  • story fear of ghost baba physical touch to women in Kurukshetra Haryana

    पिहोवा/कुरुक्षेत्र(हरियाणा)- एका जादू टोणा करणाऱ्या बाबावर महिलेला भूत बाधा झाली असे सांगून, तिला चिमट्याने मारहाण केल्याचा आरोप लागला आहे. रात्री उशीरा महिला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठ गेली. त्यानंतर पोलिस बाबाला पकडण्यासाठी गेले, पण बाबा फरार झाला. रात्री उशीरा बाबाचे चेले पोलिस ठाण्यात पोहचले आणि बाबा निर्दोष असल्याचे सांगत होते. मारकंडा गावात राहणाऱ्या महिलेने सांगितले की, ती अनेक दिवसांपासून आजारी होती. तिने अनेक रूग्णालयातून उपचार घेतला, पण काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर तिच्या ओळखीच्या महिलेने तिला बाबाबद्दल सांगितले.


    पतीसमोर बाबा चिमट्याने मारहाण करू लागला, पण पती काहीच करू शकला नाही
    बाबा जादू टोणा करून लोकांवर उपचार करतो, या चुकीच्या फंद्यात पडून महिला त्याच्याकडे गेली. जेव्हा महिलेचा नंबर आला, तेव्हा बाबाने तिच्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यावर बाबा रागात आला आणि म्हणाला हिच्यावर भूत बाधा झाली आहे. इतके सांगून बाबाने तिला चिमट्याने मारणे सुरू केले. महिलेला ओरडाना पाहून तिचा पती वाचवण्यासाठी गेला, पण बाबाच्या चेल्यांनी त्याला पकडले आणि म्हणाले- बाबा असाच उपचार करतात, मध्ये नको येऊ. या मारहाणीनंर महिला बुशूद्ध झाली, त्यानंतर पती तिला गाडीने घरी घेऊन आला.


Trending